महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ही योजना सुरू करण्यात आली होती. डिसेंबरपर्यंतचे हाप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे जानेवारीचा हाप्ता कधी मिळणार त्याकडे. त्यासोबतच 2100 रुपयांचा हाप्ता कधीपासून मिळणार असाही प्रश्न अनेकांच्या मनात आहे. आता या योजनेबाबत मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे.
महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ही योजना सुरू करण्यात आली होती. डिसेंबरपर्यंतचे हाप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे जानेवारीचा हाप्ता कधी मिळणार त्याकडे. त्यासोबतच 2100 रुपयांचा हाप्ता कधीपासून मिळणार असाही प्रश्न अनेकांच्या मनात आहे. आता या योजनेबाबत मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे.
या आधी यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणि त्यानंतरच्या काळात यावर सकारात्माक विचार होणार आहे, मात्र आता 1500 रुपयांचाच लाभ मिळणार आहे. यासाठी 3600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना आदिती तटकरे यांनी सांगितलं की डिसेंबरपर्यंत दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ज्यांच्या उत्पन्नात वाढ झाली, अशा महिलांनी लाभ परत केला. ज्या महिलांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा महिला या योजनेतून कमी होतील. ज्या महिलांचे या योजनेंतर्गत एकापेक्षा अधिक खाती आहेत, त्या महिलांना कमी केलं जाईल. जास्त काही फरक पडणार नाही, मात्र एखादा टक्का महिला योजनेतून कमी होतील असं तटकरे यांनी म्हटलं आहे.