आजकाल AI आणि गुगलवर काम कायचे असल्यास आपले ई मेल खाते लिंक करावे लागते. पण यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. Google ने पुष्टी केली आहे की 250 कोटींहून अधिक Gmail वापरकर्त्यांचे अकाउंट्स AI च्या मदतीने हॅक होऊ शकते .सायबर गुन्हेगार “Google सपोर्ट”च्या नावाने कॉल करून हामोठा घोटाळा करत आहेत. Google ने तातडीने इशारा दिला आहे की, अशा कोणत्याही फसवणुकीच्या कॉलवर विश्वास ठेवू नका आणि तुमच्या Gmail अकाउंटचा पासवर्ड त्वरित बदलून टाका.
हॅकर्सची नवीन फसवणूक पद्धत
Forbes च्या रिपोर्टनुसार, सायबर गुन्हेगार “Google सपोर्ट”च्या नावाने कॉल करून युजर्सची फसवणूक करत आहेत.
फसवणुकीचा कॉलर ID अगदी खरा वाटतो, त्यामुळे युजर्स सहजपणे त्याच्या जाळ्यात अडकतात.
हे हॅकर्स “तुमचे Gmail अकाउंट हॅक झाले आहे” असे सांगून, रिकव्हरी कोड वापरण्यास सांगतात.
हा ई-मेल आणि कोड खोटा असला तरी तो अगदी खरीसारखा दिसतो, त्यामुळे अनेक जण फसतात.
काय कराल उपाय ?
जर तुम्हाला अशा प्रकारचा ई-मेल किंवा कॉल आला तर त्याकडे दुर्लक्ष करा.
जर चुकून तुम्ही हॅकर्सच्या रिकव्हरी कोडचा वापर करून अकाउंट रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला असेल, तर लगेच तुमचा Gmail पासवर्ड बदला.
Gmail अकाउंटला ‘टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन’सह सुरक्षित ठेवा, त्यामुळे अतिरिक्त सुरक्षा स्तर मिळेल.
सायबर गुन्हेगार सतत नवीन ट्रिक्स वापरून ई-मेल अकाउंट्स हॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे सावध रहा.
Gmail चा पासवर्ड कसा रिसेट करायचा?
Android डिव्हाइसवर ‘Settings’ मध्ये जा.
‘Google’ वर टॅप करा आणि ‘Manage your Google Account’ निवडा.
वरच्या टॅबमधून ‘Security’ वर क्लिक करा.
‘Signing in to Google’ पर्याय निवडा आणि ‘Password’ वर टॅप करा.
तुम्हाला पुन्हा साइन-इन करावे लागू शकते.
नवीन पासवर्ड टाका आणि ‘Change Password’ वर टॅप करा.
जर तुम्हाला पासवर्ड आठवत नसेल, तर ‘Forgot Password’ वर टॅप करून स्क्रीनवरील निर्देशांचे पालन करा.