अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार (corporation)आणि वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिरकड यांचा अकोला ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवानी टी पॉइंटजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.मालवाहू वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यूबिरकड यांच्या दुचाकीला मालवाहू टाटा वाहनाने जोरदार धडक दिली, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, असे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरांची वाहतूक करणाऱ्या या मालवाहू वाहनाचा काही पोलिस पाठलाग करत होते. त्यामुळे वाहनचालकाने वेगाने वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच हा अपघात घडला.
आज अकोला शहरातील सिटी स्पोर्ट्स क्लब येथे भारतीय जनता पक्षाच्या अमरावती विभागातील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक होती. या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कामगार मंत्री आकाश फुंडकर, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके उपस्थित होते. तुकाराम बिरकड हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी गेले होते. भेटीनंतर मोटारसायकलवर परतत असताना, जनावरे वाहून नेणाऱ्या मालवाहू वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला (corporation)जबर धडक दिली. या अपघातात बिरकड यांच्यासह त्यांचे सहकारी यांचा सुद्धा मृत्यू झाला.दोन दिवसांनी ते सहपरिवार महाकुंभ मेळ्यात जाणार होते. मात्र, आधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघाताची बातमी कळताच, त्यांच्या पत्नी, भाऊ प्रकाश बिडकर आणि शत्रूघन बिरकड यांना अश्रू अनावर झाले.
अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि अपघातातील वाहन जप्त करून वाहनचालकासह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले.राजकीय क्षेत्रात शोककळा
तुकाराम बिरकड यांच्या अपघाती निधनाची बातमी कळताच (corporation)अकोल्यातील राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली. त्यांना ज्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते, त्या ठिकाणी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी भेट दिली. यावेळी भाजप, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या आमदारांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.