Wednesday, February 19, 2025
Homeमहाराष्ट्रजिओच्या एक क्वाईनची किंमत इतकी असणार? असा होणार फायदा

जिओच्या एक क्वाईनची किंमत इतकी असणार? असा होणार फायदा

टाइम्स ऑफ इंडियामधील बातमीनुसार, सध्या जिओ क्वाईनच्या किंमतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. परंतु काही तज्ज्ञांकडून एक टोकनची किंमत 0.50 डॉलर (जवळपास 43.30 रुपये) असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

जिओ क्वाईन हे डिजिटल चलन आहे. सध्या त्याला क्रिप्टोकरन्सी म्हणणे योग्य नाही. इथरियम किंवा बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीऐवजी रिलायन्स जिओचे हे नाणे रिवॉर्ड टोकन किंवा डिजिटल लॉयल्टी पॉइंटसारखे आहे.

 

इकोनॉमिक्स टाईम्सच्या अहवालानुसार, पॉलीगॉन ब्लॉकचेनवर तयार केलेले हे नाणे जिओची सेवा देणाऱ्या अ‍ॅप्समध्ये वापरले जाऊ शकते. तसेच जिओ अ‍ॅप्सवर खरेदी करून नाणे मिळवता येईल. जिओ कॉइन्स गेम चेंजर ठरू शकतात कारण तुम्ही ही नाणी जिओ अ‍ॅप्समध्ये डिस्काउंटसाठी वापरू शकता.

 

जिओ क्वाईन रिलायन्स पेट्रोल पंप आणि जिओ मार्ट या सारख्या लोकप्रिय सेवांसारख्या रिलायन्स जिओच्या मोठ्या इकोसिस्टममध्ये कशा पद्धतीने वापरता येणार? हे येत्या काही दिवसांत समोर येणार आहे.

 

जिओ क्वाईन मिळवण्यासाठी तुमच्या फोनमध्ये JioSphere अ‍ॅप इंस्टॉल करा, हे ॲप Android आणि Apple वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. अ‍ॅप इन्स्टॉल झाल्यानंतर त्यावर खाते तयार करावे लागेल. त्यानंतर जसा तुम्ही वापर कराल हळूहळू रिवॉर्ड म्हणून नाणी मिळू लागतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -