Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!! राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेंर्तगत मिळणार मोफत वीज

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!! राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेंर्तगत मिळणार मोफत वीज

सध्या महायुती सरकार (Mahayuti Government) राज्यातील नागरिकांसाठी अनेक विविध योजना जाहीर करत आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज विधानसभेत शेतकऱ्यांसाठी (Farmers) आणखीन एका योजनेची घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडून ‘बळीराजा मोफत वीज योजना’ (Baliraja Free Electricity Scheme) जाहीर करण्यात आली आहे. यामुळे तब्बल 45 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे, जे 16,000 मेगावॅट वीज केवळ कृषी क्षेत्रासाठी उपलब्ध करून देणार आहे.

 

त्याचबरोबर, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना डिसेंबर 2026 पर्यंत सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना वर्षभर 365 दिवस दिवसभर वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

1 कोटी 34 लाख ग्राहकांना मोफत वीज

राज्य सरकारने केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही तर घरगुती ग्राहकांसाठीही मोठी घोषणा केली आहे. राज्यातील तब्बल 1 कोटी 34 लाख ग्राहकांना मोफत घरगुती वीज पुरवली जाणार आहे. तसेच, स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना दिवसा 10 टक्के वीज बिलात सवलत दिली जाणार आहे. त्याचबरोबर, राज्य सरकारने पारंपरिक ऊर्जेवर अवलंबून न राहता पर्यायी ऊर्जेचा वापर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, 2030 पर्यंत राज्यातील 52 टक्के वीज अपारंपरिक स्रोतांमधून निर्माण केली जाणार आहे.

 

मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, भविष्यात डेटा सेंटर सर्वाधिक महत्त्वाचे असतील. कारण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात डेटा हेच नवे धन मानले जात आहे. त्यामुळे मोठ्या डेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक प्रमाणात वीजपुरवठा केला जाईल, यावर सरकार अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.

 

 

विधानसभेतील महत्त्वाचे मुद्दे

 

45 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज

महाराष्ट्र कृषी क्षेत्रासाठी सर्वाधिक 16,000 मेगावॅट वीज देणारे पहिले राज्य

डिसेंबर 2026 पर्यंत शेतकऱ्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा

1 कोटी 34 लाख घरगुती ग्राहकांना मोफत वीज

2030 पर्यंत 52% वीज अपारंपरिक स्रोतांमधून मिळणार

स्मार्ट मीटर लावणाऱ्या ग्राहकांना, वीज बिलात 10% सवलत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -