Monday, July 28, 2025
Homeक्रीडाचॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आज भारत-न्यूझीलंडची लढाई; हवामान विभागाने वर्तवला धक्कादायक अंदाज

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आज भारत-न्यूझीलंडची लढाई; हवामान विभागाने वर्तवला धक्कादायक अंदाज

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025 Final) अंतिम सामना आज भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand Final) यांच्यात होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर भारत आणि न्यूझीलंडचा सामना खेळवला जाईल. भारत आणि न्यूझीलंड हे दोघेही हे विजेतेपद जिंकण्याचे मोठे दावेदार आहेत. त्यामुळे आज कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

भारतीय संघाचा विजय रथ-

टीम इंडिया 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्व सामने जिंकत आहे. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेश, दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. यानंतर भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवले. भारतीय संघाने दुबईमध्ये चारही सामने खेळले आणि त्या सर्वांमध्ये सहज विजय मिळवले.

 

भारताला न्यूझीलंडचे तगडे आव्हान-

न्यूझीलंड क्रिकेट संघाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनीही चांगले क्रिकेट खेळले आहे, न्यूझीलंडला फक्त ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाकडून पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडनेही दुबईमध्ये स्पर्धेतील एक सामना खेळला आहे, त्यामुळे हे मैदान किवी खेळाडूंसाठीही नवीन नसेल भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान दुबईमध्ये हवामान कसे असेल? (

IND vs NZ Weather Forecast)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक 2 वाजता होईल. यावेळी तापमान 30 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे. सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता 10 टक्के आहे, आर्द्रता 43 टक्के असेल. तसेच ताशी 20 ते 25 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दुबईमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि हलका पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पण भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द होण्याची शक्यता नाही.

 

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.

 

न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल ओरुक.

 

भारत आणि न्यूझीलंडचा संपूर्ण संघ-

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.

 

न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), डॅरिल मिचेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नाथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग, जेकब डफी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -