नोटाबंदीनंतर 2000 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा(notes) चलनात आणल्या गेल्या होत्या. पण, नंतर 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. सध्या 500, 200 आणि त्यापेक्षा कमी रकमेच्या नोटा चलनात पाहिला मिळत आहेत. असे असताना आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने नव्या नोटांबाबत मोठी घोषणा केली आहे.
नोटा रद्द झाल्यानंतर भारतात रोख प्रवाह कसा होता हे देखील आपल्याला समजेल.
देशात सध्या रोख रकमेचे चलन पूर्वीपेक्षा जास्त वाढले आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, मार्च 2017 मध्ये रोख चलन 13.35 लाख कोटी रुपये होते, तर मार्च 2024 पर्यंत ते 35.15 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले. याशिवाय, यूपीआयद्वारे डिजिटल व्यवहार देखील वेगाने वाढत आहेत. मार्च 2020 मध्ये, यूपीआय व्यवहार 2.06 लाख कोटी होते, तर फेब्रुवारी 2024 पर्यंत ते 18.07 लाख कोटींवर पोहोचले आहे.
दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये चालू आर्थिक वर्षात सर्वाधिक रक्कम एटीएममधून काढली गेली. तर, सण आणि निवडणुकीच्या काळात रोख रकमेची मागणी वाढल्याचं दिसून आलं. ग्रामीण भागात डिजीटल पेमेंटची सेवा मर्यादित आहे. यामुळं लोक रोख रकमेचा वापर व्यवहारासाठी करतात.