Thursday, March 13, 2025
Homeक्रीडाअशी असेल Mumbai Indians ची Playing XI; कोणाकोणाला संधी मिळणार?

अशी असेल Mumbai Indians ची Playing XI; कोणाकोणाला संधी मिळणार?

आताच काही दिवसांपूर्वी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये (champions trophy 2025) दमदार विजय मिळवला आहे. आता क्रिकेटप्रेमी आयपीएल 2025 (IPL) च्या स्पर्धेची प्रतीक्षा करत आहेत.

 

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनला 22 मार्च पासून सुरुवात होणार असून , मुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध 23 मार्च रोजी पहिला सामना रंगताना दिसणार आहे. पण मेगा ऑक्शननंतर मुंबई इंडियन्सच्या संघात काही महत्वाचे बदल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या बदलामध्ये काही आधीचे खेळाडू बाहेर पडून , दुसऱ्या खेळाडूंचा समावेश झाला आहे. त्यामुळे फॅन्सची उत्सुकता वाढली आहे.

 

कर्णधारपदाची संधी (IPL 2025) –

 

मुंबई इंडियन्सने 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या असून, संघाचा कर्णधार रोहित शर्मा होता. पण आयपीएल 2024 च्या आधी पंड्याला नेतृत्व देण्यात आले होते. अन यंदाही आयपीएल 2025 साठी त्याला पुन्हा कर्णधारपदाची संधी देण्यात आली आहे.

 

मुंबई इंडियन्सची प्लेइंग 11 –

 

रोहित शर्मा (ओपनिंग बॅट्समन) – मुंबई इंडियन्सचा सलामीवीर खेळाडू रोहित शर्मा यंदाही ओपनिंगला (IPL 2025) उतरू शकतो.

 

विल जॅक (ओपनिंग बॅट्समन) – इंग्लंडचा स्टार फलंदाज विल जॅक आयपीएल 2024 मध्ये आरसीबीकडून खेळला होता आणि त्याच्या दमदार फलंदाजीमुळे तो यंदा मुंबईसाठी ओपनिंग करू शकतो.

 

नमन धीर (तिसऱ्या क्रमांकावर) – युवा फलंदाज नमन धीर त्याच्या प्रभावी परफॉर्मन्सने आयपीएल 2024 मध्ये सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे त्याला मुंबई इंडियन्ससाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरवले जाऊ शकते.

 

सूर्यकुमार यादव (चौथ्या क्रमांकावर) – भारताचा टी 20 कर्णधार सूर्यकुमार यादव, जो गेल्या काही सीजनमध्ये मुंबई इंडियन्सचा मॅच विनिंग खेळाडू ठरला आहे, यंदा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल.

 

तिलक वर्मा (पाचव्या क्रमांकावर) – डावखुरा फलंदाज तिलक वर्मा, जो मुंबईचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे, पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.

 

हार्दिक पंड्या (नंबर 6) IPL 2025- मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या, जो फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये प्रभावी आहे, त्याला नंबर 6 वर फलंदाजीसाठी उतरवले जाऊ शकते.

 

रॉबिन मिन्झ (नंबर 7) – झारखंडचा खेळाडू रॉबिन मिन्झ मोठ्या शॉट्ससाठी प्रसिद्ध आहे. तो मुंबईसाठी सातव्या क्रमांकावर उतरण्याची शक्यता आहे.

 

दीपक चहर (गोलंदाज) – चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळलेल्या दीपक चहरला मुंबई इंडियन्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तो पॉवरप्लेमध्ये विकेट घेण्याचे महत्त्वपूर्ण काम करेल.

 

मिचेल सॅंटनर (फिरकीपटू) – न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅंटनर, जो आपल्या फिरकीगोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे, मुंबईच्या संघात फिरकीपटू म्हणून भूमिका निभावू शकतो.

 

मुजीब उर रहमान (फिरकीपटू) – अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर रहमान, जो अल्लाह गझनफरची जागा घेईल, तो मुंबईसाठी (IPL 2025) महत्त्वपूर्ण गोलंदाज ठरू शकतो.

 

जसप्रीत बुमराह (गोलंदाज) – जसप्रीत बुमराह सध्या पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असला तरी, तो काही दिवसांमध्ये पुन्हा आगमन करू शकतो. त्याच्या अनुभवामुळे तो मुंबईसाठी महत्त्वपूर्ण गोलंदाज राहील. संपूर्ण संघात एकत्रित केलेल्या विविध खेळाडूंच्या सहाय्याने मुंबई इंडियन्स यंदा आयपीएल 2025 मध्ये एक भक्कम संघ तयार करून दमदार कामगिरी करेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -