जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळा बसत आहे. एकीकडे उन्हाच्या झळा आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले असून यातच हवामान खात्याने राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागराकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागावर अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे.या भागात १९ ते २१ मार्चदरम्यान विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
विशेष हवामान खात्याने आज १९ मार्च रोजी जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मंगळवारी नाशिक येथे कमाल ३८.२ तर किमान १९.८ अंश नोंद झाली. जिल्ह्यात आगामी दोन दिवस पावसाचा अंदाज असून यादरम्यान ढगाळ वातावरण राहून कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
या ठिकाणी पावसाचा अंदाज
१९ मार्च : धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर
२० मार्च धुळे, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जळगाव,
२१ मार्च भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ
२२ मार्च भंडारा, गडचिरोली, वर्धा चंद्रपूर, गोंदिया, नागपूर,
२१ मार्च परभणी, हिंगोली, नांदेड नोंद करण्यात आली आहे.