Tuesday, December 16, 2025
Homeअध्यात्मअशा मित्रांपासून चार हात दूरच राहा; नाहीतर येईल पश्चतापाची वेळ, चाणक्य काय...

अशा मित्रांपासून चार हात दूरच राहा; नाहीतर येईल पश्चतापाची वेळ, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान कुटनीती तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, आणि राजकीय तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहीला. या ग्रंथामध्ये त्यांनी आदर्श आयुष्य कसं जगावं? काय करू नये, काय करावं याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. आजही अनेकांना आपलं आयुष्य जगत असताना हा ग्रंथ मार्गदर्शक ठरत आहे. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आपले विचार मांडले आहेत. आदर्श पती कसा असावा? आदर्श पत्नी कशी असावी? पतीची कर्तव्य कोणती? पत्नीची कर्तव्य कोणती. राजाने कोणत्या चुका करू नये? राजाची कर्तव्य काय आहेत? कोणाला आपला मित्र म्हणावं, शत्रू कसा ओळखावा अशा एकना अनेक विषयांवर आर्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आहे.

 

आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये आदर्श मित्राचे काही लक्षणं सांगितली आहेत, तसेच मित्रांचे असे देखील काही गुण सांगितले आहेत, ते गुण जर तुम्हाला तुमच्या मित्रांमध्ये दिसून आले तर त्याच्यापासून चार हात दूरच राहा असा सल्ला आर्य चाणक्य यांनी दिला आहे. मित्राने कधीच मित्राचा विश्वासघात करता कामा नये असं आर्य चाणक्य म्हणतात. मैत्री हे नात सर्वच नात्यांमध्ये श्रेष्ठ नातं असतं. त्यामुळे कोणासोबतही मित्रता करताना माणसानं सावध असावं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

 

अशा लोकांपासून दूर राहा

 

आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रथांमध्ये एक आदर्श मित्र कसा असावा याबाबत विस्तृत लिखान केलं आहे. आर्य चाणक्य म्हणतात की मैत्रीमध्ये कोणताही आडपडदा नसावा. मात्र जर तुमच्या एखाद्या मित्राने तुमचा विश्वासघात केला आहे, अशी तुमची खात्री पटली तर तुम्ही अशा मित्रापासून योग्य ते अंतर ठेवा. मित्र हा आपल्या चुका सुधारण्यासाठीच असतो, तो जर आपल्या चुका आपल्या तोंडावर सांगत असेल तर तो उत्तम मित्र असं चाणक्य म्हणतात. मात्र तुमचा मित्र जर तुमच्या पाठिमागे इतर लोकांसमोर निंदा करत असेल तर असा मित्र असण्यापेक्षा नसलेला बरा असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -