Saturday, July 5, 2025
Homeमहाराष्ट्रसंतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणाने महाराष्ट्र हळहळला होता. विधिमंडळ सभागृहात या हत्याप्रकरणाचे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर गृहमंत्र्यांच्या आदेशान्वये याप्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात आली. त्यातच, आमदार सुरेश धस यांच्याकडूनही वारंवार तपासाबाबत गौप्यस्फोट केले जात होते. त्यामध्ये, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांना बदनाम करण्यासाठी चक्क एका महिलेला उभं करण्यात आल्याचे वृत्तही माध्यमांत झळकले होते. आता, संबंधित महिलेची हत्या झाल्याचे समोर आलं आहे. देशमुख यांना चुकीच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी उभे करण्यात आलेल्या महिलेची हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. मनिषा बिडवे असं त्या महिलेचं नाव असून संतोष देशमुखांनी अनैतिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यासाठी या महिलेला कराड गँगकडून तयार करण्यात आलं होतं. या महिलेचा बीड जिल्ह्यात कळंबमध्ये पाच दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असून पोलिसांनी (Police) जागेवरच पोस्टमॉर्टम आणि अत्यंविधी उरकल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. आता, हत्या प्रकरणावर धनंजय देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

 

मी वेळोवेळी सांगत आलो आहे, केज पोलीस स्टेशनमधील पहिल्या 8 दिवसाच्या तपासाचे री-इन्वेस्टीगेशन करावे. त्याच्यातलाच हा एक भाग आहे, हत्या केल्यानंतर चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी एक महिला तयार केली गेली होती. आरोपीने तयार केलेली ती महिला होती. त्याच्या अगोदर या गोष्टीमुळे कित्येक जण बळी पडले असतील. मात्र, पोलिसांनी त्याला गांभीर्याने घेतलं नाही, असे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी म्हटले. त्या महिलेचा कुणीतरी खून केल्याची बातमी आली आहे, याला कारणीभूत कोण आहे? आता याची जबाबदारी कोण घेईल, याचा कुठलाही तपास पोलिसांनी केला नसल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले.

 

पथम दर्शनी महिलेचा संतोष देशमुख प्रकरणाशी संबंध नाही – पोलीस

कळंब येथील मृत महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध आढळला नाही. मात्र, त्या अनुषंगाने तपास करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मृत महिला दोन नाव वापरत होती. अनैतिक संबंधातूनच महिलेची हत्या झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे. स्व.संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी कळंबमध्ये मृत अवस्थेत आढळून आलेल्या महिलेचा तपासाअंती अद्याप कोणताही संबंध आढळून आला नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. तपासाअंती देशमुख हत्या प्रकरणाशी काही संबध आढळून आल्यास माहीती दिली जाईल, असे कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी म्हटले. सदरील मयत महिला मनिषा कारभारी बिडवे यांचा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. महिलेच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. महिलेच्या मृत्यूप्रकरणी दोन आरोपी निष्पन्न झाले असून आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आले आहेत. लवकरच आरोपी पकडले जातील, असेही संजय पवार यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -