Saturday, July 26, 2025
Homeमहाराष्ट्रभावाची हत्या करून स्वतःला संपवलं; विरहात प्रेमिकेने कवटाळले मृत्यूला;

भावाची हत्या करून स्वतःला संपवलं; विरहात प्रेमिकेने कवटाळले मृत्यूला;

मोटरसायकल नेण्याच्या क्षुल्लक कारणातून वाद करून लहान भावाचा खून करून फरार झालेल्या मोठ्या भावानेही फाशी घेऊन जीवन संपविले. तत्पूर्वी त्याने प्रेमिकेला मोबाईलवर त्याचे काही फोटो पाठविल्यामुळे प्रेमिकेनेही गळफास लावून मृत्यूला

 

एका लहानशा कारणामुळे तीन जीवांची होळी झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

शेंबाळपिंपरी जवळच्या वागदरा परिसरातील दिनेश शिरफुले (वय २१) याने त्याचा मोठा भाऊ मनीष शिरफुले (वय २३) याची दुचाकी त्यालन विचारता नेली. त्यावरून शुक्रवारी (ता. २८) रात्री दोघांमध्ये वाद झाला.

 

रागाच्या भरात मनीषने लहान भाऊ दिनेशवर फावड्याने वार केला. त्यात दिनेशचा मृत्यू झाला. दिनशचा खून केल्यानंतर मनीष फरार झाला. पोलिस तेव्हापासून त्याच्या मागावर होते. परंतु, त्याने आज सोमवारी (ता. ३१) सकाळी कळमनुरी येथील चिंचाळेश्‍वर महादेव मंदिराच्या मागील शेतात झाडाला फाशी लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

 

मनीषची कळमनुरी तालुक्यात तरुणीशी प्रेमसंबंध होते. तिनेही सोमवारीच सकाळी फाशी लावून जीवन संपविले. मनीषने आत्महत्या करण्यापूर्वी प्रेमिकेला काही फोटो पाठविल्याची माहिती आहे. एका क्षुल्लक कारणावरून दोन सख्खे तरुण भाऊ व एक तरुणी जीवनातून उठले. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

मृत शिरफुले बंधू अविवाहित होते. त्यांच्यावर आई-वडिलांचे छत्रही नव्हते. नातवांच्या जाण्याने हयात असलेली आजी खिन्न मनाने घरी येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे मूकपणे पाहत होती. या प्रकरणी खंडाळा व कळमनुरी पोलिस संयुक्त तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -