मोबाईल पाण्यात टाकून खराब केल्याच्या रागातून सातवीतल्या मुलाने चक्क डोक्यात दगड घालून गावातील महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना जालन्यातून उघडकीस आली आहे . घनसावंगी तालुक्यातल्या अंतरवाली टेंभी गावात ही घटना घडलीय . या घटनेनंतर संपूर्ण मराठवाडा हादरला असून शेतात शेजारी राहणाऱ्या महिलेने फोन लावण्यासाठी या मुलाचा मोबाईल घेतला होता .मात्र तो पाण्यात पाडून खराब केल्याचा रागातून 13 वर्षाच्या मुलाने गावातील महिलेला संपवल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे .
शेताजवळ शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलानेच हे कृत्य केल्याचे जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले आहे .याप्रकरणी अल्पवयीन मुलाने खुनाची कबुली दिली असून त्याला बाल सुधार गृहात पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले .
घटना उघडकीस कशी आली?
25 मार्च रोजी घनसावंगी तालुक्यातील टेंभी अंतरवली गावामध्ये मिराबाई बोंढारे या 41 वर्षीय महिलेच्या कुणाची घटना उघडकीस आली होती .आरोपीचा मागवा काढण्याचा बराच प्रयत्न पोलिसांकडून होत होता .परिस्थितीजन्य पुराव्यांचा आधारे पोलिसांनी गावात चौकशी केली . या महिलेच्या शेताजवळ राहणाऱ्या तेरा वर्षीय मुलाची चौकशी केली असता या मुलानेच खूनाची कबुली दिल्याचे समोर आले आहे . याप्रकरणी या मुलाला बाल सुधारगृहात पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे .
फोन करण्यासाठी घेतला मोबाईल, पण..
जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील अंतरवली टेंभी गावात राहणाऱ्या एका महिलेने फोन लावण्यासाठी शेताजवळ शेजारी राहणाऱ्या 13 वर्षाच्या मुलाकडून मोबाईल घेतला. पण मुलाचा फोन पाण्यात पडून खराब झाला. महिलेने मोबाईल पाण्यात पाडून खराब केल्याच्या रागातून सातवीतल्या या अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात महिलेच्या डोक्यात दगड घालून महिलेला ठार केल्याची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शेतात काही दिवसांपूर्वी महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. यावर जालना गुन्हा शाखेकडून तपास सुरु होता. संबंधित घटनेविषयी चौकशी सुरु असताना महिलेल्या शेताजवळ राहणाऱ्या मुलाची पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीतून या मुलानेच महिलेचा खून केल्याची कबूली दिली आहे. मोबाईलसाठी डोक्यात दगड घालून या मुलाने महिलेला संपवल्याच्या घटनेनंतर संपूर्ण मराठवाडा हादरला आहे.