Tuesday, August 26, 2025
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचे सर्व न्यायाधीश संपत्ती जाहीर करणार!

मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचे सर्व न्यायाधीश संपत्ती जाहीर करणार!

काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घराला आग लागल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रक्रियेदरम्यान कोट्यवधींची रोकड मिळाली होती. त्यानंतर संपूर्ण देशात एकच गजहब उडाला होता. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडे कोट्यवधीची रोकड कुठून आली, असा सवाल विचारला जाऊ लागला. असे असतानाच सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा म्हणून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपापली संपत्ती जाहीर करणार आहेत.

 

नेमका काय निर्णय घेण्यात आला आहे?

मिळालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वच न्यायाधीशांनी आपापली संपत्ती सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. एक एप्रिल रोजीच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानंतर आता सरन्यायाधीशांसहित सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या संपत्तीचा तपशील सार्वजनिक करणार आहेत. याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वच न्यायाधीशांनी आपापल्या संपत्तीची माहिती सरन्यायाधीशांना दिली होती.

 

आतापर्यंत कोणी-कोणी संपत्तीची माहिती दिली?

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या 34 आहे. यात सध्या एक पद रिक्त आहे. यातल्या 30 न्यायाधीशांनी आपापल्या संपत्तीची माहिती न्यायालयाला दिली आहे. मात्र न्यायाधीशांनी दिलेल्या संपत्तीची माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. फक्त ज्या न्यायाधीशांनी आतापर्यंत संपत्तीची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिलेली आहे, त्यांची नावे संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहेत. न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई, न्यायमूर्ती सूर्यकान्त, न्यायमूर्ती अभय.एस. ओका, न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी, न्यायमूर्ती बी.वी. नागरत्ना आणि इतर न्यायमूर्तींचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -