Monday, April 28, 2025
Homeक्रीडामुंबई इंडियन्सचा तिसरा पराभव, लखनौचा रंगतदार सामन्यात विजय, घरच्या मैदानात पलटणवर 12...

मुंबई इंडियन्सचा तिसरा पराभव, लखनौचा रंगतदार सामन्यात विजय, घरच्या मैदानात पलटणवर 12 धावांनी मात

लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) 16 व्या सामन्यात 12 धावांनी विजय मिळवला आहे. लखनौने मुंबईला विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं. रंगतदार झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादव याने केलेल्या खेळीमुळे मुंबई सामन्यात कायम राहिली. मात्र सूर्या निर्णायक क्षणी आऊट झाला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने मुंबईची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत विजयापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. मात्र हार्दिकला या प्रयत्नात तिलक वर्मा याची साथ मिळाली नाही. त्यामुळे मुंबई सामन्यात पिछाडीवर गेली. लखनौ अशाप्रकारे मुंबईला विजयापासून 12 धावांनी दूर ठेवण्यात यशस्वी ठरली. मुंबईला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 191 धावाच करता आल्या. लखनौने यासह दुसरा विजय मिळवला. तर मुंबईचा हा तिसरा पराभव ठरला.

 

मुंबईची बॅटिंग

मुंबईची 204 धावांचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात राहिली. रायन रिकेल्टन आणि विल जॅक्स सलामी जोडी झटपट आऊट झाली. जॅक्सने 5 तर रायने 10 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर सूर्यकुमार यादव-नमन धीर या जोडीने मुंबईचा डाव सावरला आणि मैदानात घट्ट पाय रोवले. त्यामुळे मुंबईच्या विजयाची आशा कायम होती. मात्र दिग्वेश सिंह राठी याने मोक्याच्या क्षणी ही जोडी फोडली. राठीने नमनला 46 धावांवर बोल्ड केलं. अशापक्रारे सूर्या आणि नमन या दोघांची 69 धावांच्या भागीदारीला ब्रेक लागला.

 

नमननंतर इमपॅक्ट प्लेअर म्हणून तिलक वर्माची एन्ट्री झाली. सूर्या आधीच सेट होता. त्यामुळे या जोडीकडून मुंबईला आशा होती. सूर्या आणि तिलकने मुंबईला सामन्यात कायम ठेवलं. सूर्या एका बाजूला संधी मिळेल तेव्हा फटकेबाजी करुन रनरेट कमी करण्याचा प्रयत्न करत होता. तर दुसऱ्या बाजूला तिलक वर्मा एक-एक धाव घेत अपेक्षित रनरेट वाढवत होता. मात्र सूर्या फटकेबाजी करुन भरपाई करत होता. दोघांनी 66 धावांची भागदारी केली. सामना शेवटच्या आणि रंगतदार स्थितीत पोहचला होता.

 

लखनौला सामन्यात कमबॅक करण्यासाठी एका विकेटची गरज होती. आवेश खान याने ही विकेट घेतली आणि सामना काही अंशी लखनौच्या बाजूने फिरला. आवेशने सूर्याला 17 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर 67 धावांवर आऊट केलं. सूर्यानंतर कॅप्टन हार्दिक पंड्या मैदानात आला. तर दुसऱ्या बाजुला तिलक होता. सूर्याने काही मोठे फटके मारुन मुंबईला जिंकवण्याचा प्रयत्न केला. मात्र हार्दिकला दुसऱ्या बाजूने तिलककडून साथ मिळालीच नाही. तिलकला धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. एक एक बॉलनंतर सामना लखनौच्या बाजूने झुकत चालला होता. त्यामुळे तिलकला 19 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलनंतर रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर पाठवण्यात आलं. तिलकला मैदानाबाहेर पाठवण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न चाहत्यांना पडला. तिलक 23 बॉलमध्ये 25 रन्स करुन मैदानाबाहेर गेला.

 

तिलकनंतर मिचेल सँटनर मैदानात आला. सँटनरला 2 बॉल खेळण्याची संधी मिळाली. सँटरने 2 धावा केल्या. तर हार्दिकने शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र मुंबईला विजय मिळवून देता आला नाही. हार्दिक 28 धावांवर नाबाद परतला. तर दुसर्‍या बाजूला लखनौकडून रवी बिश्नोईचा अपवाद वगळता आवेश खान, शार्दूला ठाकुर, आकाश दीप आणि दिग्विजय सिंह राठी या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

 

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश सिंग राठी, आकाश दीप आणि आवेश खान.

 

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेन्ट बोल्ट, अश्वनी कुमार, दीपक चहर आणि विघ्नेश पुथूर.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -