Tuesday, July 29, 2025
Homeक्रीडाकेएल राहुलची मॅचविनिंग खेळी, दिल्लीचा सलग चौथा विजय, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा

केएल राहुलची मॅचविनिंग खेळी, दिल्लीचा सलग चौथा विजय, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा

दिल्ली कॅपिट्ल्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 24 व्या सामन्यात अक्षर पटेल याच्या नेतृत्वात यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव करत सलग चौथा विजय मिळवला आहे. आरसीबीने दिल्लीला विजयासाठी 164 धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीने हे आव्हान 13 बॉलआधी 4 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. दिल्लीने 17.5 ओव्हरमध्ये 169 धावा केल्या. लोकल बॉय केएल राहुल हा दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. तर ट्रिस्टन सटब्स याने केएलला अप्रतिम साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद शतकी आणि विजयी भागीदारी साकारली.

 

दिल्लीची 164 धावांचा पाठलाग करताना फ्लॉप सुरुवात झाली. दिल्लीने पावरप्लेमध्ये 30 विकेट्स गमावल्या. फाफ डु प्लेसीस 2,जॅक फ्रेझर मॅकग्रूक आणि अभिषेक पोरेल या दोघांनी प्रत्येकी 7 धावा केल्या. त्यामुळे दिल्लीची 3 आऊट 30 अशी स्थिती झाली. त्यानंतर कर्णधार अक्षर पटेल 15 धावा करुन माघारी परतली.

 

पाचव्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी

अक्षर पटेल आऊट झाल्यांनतर केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स या दोघांनी अप्रतिम बॅटिंग केली. ट्रिस्टन स्टब्स याने केएलला अधिकाअधिक स्ट्राईक दिली. केएलने याचा फायदा घेत फटकेबाजी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 111 धावांची भागीदारी केली आणि दिल्लीला सलग चौथा विजय मिळवून दिला. केएलने 53 चेंडूत 6 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 93 धावा केल्या. तर ट्रिस्टन स्टब्सने 23 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 4 फोरसह नॉट आऊट 38 रन्स केल्या. आरसीबीसाठी भुवनेश्वर कुमारने 2 विकेट्स घेतल्या. तर यश दयाल आणि सुयश शर्मा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

 

दिल्लीचा विजयी चौकार

 

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.

 

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन: फाफ डू प्लेसिस, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -