Monday, April 28, 2025
Homeक्रीडादिल्ली कॅपिट्ल्सची सुपर ओव्हरमध्ये राजस्थानवर मात, अक्षर पटेलच्या नेतृत्वात एकूण पाचवा विजय

दिल्ली कॅपिट्ल्सची सुपर ओव्हरमध्ये राजस्थानवर मात, अक्षर पटेलच्या नेतृत्वात एकूण पाचवा विजय

दिल्ली कॅपिट्ल्सने अक्षर पटेल याच्या नेतृत्वात आयपीएलच्या 18 व्या मोसमातील एकूण पाचवा विजय मिळवला आहे. या मोसमातील 32 व्या सामन्यात दिल्ली विरुद्ध राजस्थान आमनेसामने होते. मात्र सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये पोहचला. दिल्लीने त्यानंतर राजस्थानवर सुपर ओव्हरमध्ये मात करत हा विजय साकारला.राजस्थानने दिल्लीला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 12 धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीने हे आव्हान 2 चेंडू राखून पूर्ण केलं. दिल्लीने 4 बॉलमध्ये 13 धावा केल्या. केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स या जोडीने या 13 धावा करुन दिल्लीला विजय मिळवून दिला. त्याआधी दिल्लीने राजस्थानला विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं होतं. राजस्थानला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 2 धावांची गरज होती. तेव्हा अक्षर पटेल याने स्ट्राईक एंडवर केलेल्या थ्रोवर विकेटकीपर केएल राहुल याने ध्रुव जुरेलला रन आऊट केलं. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.

 

राजस्थान 9 धावा करण्यात अपयशी

दरम्यान राजस्थान शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावा करण्यात अपयशी ठरली. शिमरॉन हेटमायर आणि ध्रुव जुरेल ही जोडी मैदानात होती.दिल्लीकडून मिचेल स्टार्क बॉलिंगसाठी आला. स्टार्कने चिवट बॉलिंग केली. स्टार्कने पहिल्या 4 बॉलमध्ये 5 धावा दिल्या. तर पाचव्या बॉलवर राजस्थानच्या जोडीला 2 धावा घेण्याची संधी होती. मात्र ध्रुव जुरेल याने चूक केली. त्यामुळे राजस्थानला एकच धाव मिळाली. त्यामुळे राजस्थानला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 2 रन्स पाहिजे होत्या. मात्र ध्रुव दुसरी धाव घेताना रन आऊट झाला. त्यामुळे राजस्थानही 188 धावाच करु शकली आणि सामना टाय झाला.

 

राजस्थानची बॅटिंग

राजस्थानकडून नितीश राणा आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी सर्वाधिक आणि प्रत्येकी 51-51 धावा केल्या. कॅप्टन संजू सॅमसन रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. संजूने 31 धावा केल्या. रियान पराग याने 8 धावा जोडल्या. ध्रुव जुरेल याने 17 चेंडूत 26 धावा केल्या. तर शिमरॉन हेटमायर याने नाबाद 15 धावा केल्या. तर दिल्लीकडून मिचेल स्टार्क, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -