देशातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, ऐन हातातोंडाशी आलेला घास निर्सगानं हिरावून घेतला आहे, फळ पिकांना मोठा फटका बसला आहे.
राज्यासह देशभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे, दिल्लीमध्ये धुळीचं वादळ निर्माण झालं असून, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला, त्यामुळे येथील नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
दुसरीकडे पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून बिहारमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, बिहारमधील बारा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बिहारप्रमाणेच उत्तर प्रदेशमध्ये देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
दुसरीकडे पंजाब, हरियाणा, झारखंड आणि जम्म-काश्मीरमध्ये देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान महाराष्ट्रात मात्र उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे, विदर्भात अनेक जिल्हांचं तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे.