आज सलग सहाव्या दिवशी शेअर बाजाराने तेजीसह सुरुवात केली. सेन्सेक्स 320 अंकांनी वाढून 79,728 वर उघडला. निफ्टी 60 अंकांनी वाढून 24,185वर उघडला. बँक निफ्टी 110 अंकांनी वाढून 55,414 वर उघडला.
सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी मेटल आणि फार्मा निर्देशांकात वाढ दिसून आली. बाजार उघडताच, निफ्टी आयटी निर्देशांकात घसरण दिसून आली.
आज निफ्टीवर बँक, फायनान्शियल, एफएमसीजी, मेटल, फार्मा आणि रिअल्टी निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. तर निफ्टीवरील ऑटो आणि आयटी निर्देशांक लाल रंगात दिसून येत आहेत.
Stock Market Today
आज सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 13 शेअर्स ग्रीन झोनमध्ये आणि 17 शेअर्स रेड झोनमध्ये दिसत आहेत. आजच्या सर्वाधिक वाढणाऱ्या शेअर्समध्ये TATASTEEL, HDFCBANK, HINDUNILVR, AXISBANK, ETERNAL यांचा समावेश आहे. सर्वाधिक तोट्यात असलेल्या कंपन्यांमध्ये INDUSINDBK, INFY, HCLTECH, TECHM, POWERGRID यांचा समावेश आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्यातील तणाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पॉवेल यांना “मिस्टर टू लेट” आणि “लुजर” असे संबोधले आणि त्यांच्यावर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मंदीकडे ढकलण्यासाठी व्याजदरात तातडीने कपात न केल्याचा आरोप केला. या दोघांच्या भांडणामुळे अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली.
Stock Market Todayजागतिक संकेत कमकुवत
आज देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक संकेत कमकुवत दिसत आहेत. आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांवर दबाव दिसून येत आहे. काल अमेरिकन बाजार घसरणीसह बंद झाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन फेड अध्यक्षांवर केलेल्या शाब्दिक हल्ल्यामुळे बाजारातील भावना कमकुवत झाल्या.
BSE SENSEX
डाऊ जोन्स इंडस्ट्रियलमध्ये 972 अंकांची घसरण झाली आणि तो 38,170.41 वर बंद झाला. नॅस्डॅक कंपोझिटमध्ये 416 अंकांची घसरण झाली आणि तो 15,870.90 वर बंद झाला. तर एस अँड पी 500 निर्देशांक सुमारे 125 अंकांनी घसरून 5,158.20 वर बंद झाला.
आशियाई बाजारांवर दबाव
आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांवर दबाव दिसून येत आहे. आशियाबद्दल बोलायचे झाले तर, GIFT NIFTY 0.09 टक्क्यांनी वाढला आहे तर Nikkei 225 0.07 टक्क्यांनी खाली आला आहे.
स्ट्रेट टाईम्स 1.21 टक्क्यांनी वधारला आहे तर हँग सेंग सुमारे 0.35 टक्क्यांनी कमकुवत दिसत आहे. तैवान वेटेड 0.57 टक्के कमकुवत आहे तर कोस्पी 0.10 टक्के आणि शांघाय कंपोझिट 0.32 टक्के तेजीत आहे.