इचलकरंजी येथील शिवतीर्थ ते मलाबादे चौक मार्गावर मुख्य बसस्थानकासमोर वाहतुकीस अडथळा होईल अशी सार्वजनिक रस्त्यावर टेम्पो ट्रॅव्हलर लावल्याप्रकरणी चालकावर सागर रानगे यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुस्तफा बालेखान नदाफ (वय ३६, रा. भोने माळ, इचल.) असे त्या चालकाचे नाव आहे.
येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडील उपनिरीक्षक रत्ना गवळी आणि वाहतुक नियमन पथकातील सागर रानगे हे २१ एप्रिल रोजी रात्री गस्त घालत होते. या दरम्यान शिवतीर्थ मलाबाद चौक मार्गावर मुख्य बसस्थानकासमोर (क्र. एम. एच. ०९ सी.व्ही. ३६७८) ही टेम्पो ट्रॅव्हलर वाहतुकीस अडथळा होईल आणि मानवी जिवास धोकादायक स्थितीत लावलेली निदर्शनास आली. यावेळी मुस्तफा नदाफ याने स्वतः ट्रॅव्हलरचा चालक असल्याचे सांगितले. त्यामुळे रानगे यांच्या फिर्यादीनुसार नदाफ याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.