Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रशेअर बाजार बहारला; Sensex 80 हजार पार, गुंतवणूकदारांचा खिसा खुळखुळला

शेअर बाजार बहारला; Sensex 80 हजार पार, गुंतवणूकदारांचा खिसा खुळखुळला

शेअर बाजाराने रॉकेट भरारी घेतली आहे. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 80 हजार अंकांचा टप्पा ओलांडून व्यापार करत होता. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये सुद्धा तेजी दिसून आली. सेन्सेक्स 24,300 अंकांवर व्यापार करत आहे. शेअर बाजाराच्या तेजीमुळे एका झटक्यात गुंतवणूकदारांनी 3.62 लाख कोटी रुपये कमावले. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दराबाबत घेतलेल्या निर्णयाचे परिणाम दिसून येत आहे. तर भारत आणि अमेरिकेत व्यापार धोरणाविषयी सुरू असलेली सकारात्मक चर्चेचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. अमेरिका आणि आशियाई बाजारात दिसून येत असलेल्या तेजीचा परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीवर दिसून येत आहे.

 

सलग सातव्या दिवशी बाजाराला भरते

 

आकडेवारीवर लक्ष दिले तर शेअर बाजाराला सलग सातव्या दिवशी भरते आले आहे. त्यामुळे सेन्सेकने आतापर्यंत 7,100 अंकांची झेप घेतली आहे. तर दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजने या दिवसात जवळपास 2,000 अंकांची तेजी दिसून आली. बुधवारी शेअर बाजारात आयटी शेअरने मोठी झेप घेतली. एचसीएल, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टिसीएसच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.

 

110 दिवसांच्या उच्चांकावर सेन्सेक्स

 

शेअर बाजारा सलग 7 व्या दिवशी तेजी दिसून आली. सेन्सेक्स 110 दिवसांच्या उच्चांकावर पोहचला. हा गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासा आहे. सेन्सेक्समध्ये या 7 व्यापारी दिवसात 7100 अंकांची वाढ दिसून आली. याचा अर्थ सेन्सेक्स सरासरी रोज एक हजारांच्या अंकाची तेजी दिसून आली. या तेजीसह 80,035.36 अंकांवर व्यापार करत आहे. व्यापारी सत्रात सेन्सेक्स 658.96 अंकांच्या तेजीसह 80,254.55 अंकावर पोहचला.

 

निफ्टीची पण कमाल

 

दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा मुख्य निर्देशांक निफ्टी पण कमाल करत आहे. निफ्टी पण 100 पेक्षा अधिक दिवसांच्या उच्चांकावर पोहचला आहे. याचा अर्थ 10 जानेवारीनंतर निफ्टी 24,350 पेक्षा अधिक अंकांवर व्यापार करताना दिसून आला. निफ्टीला आता त्याच्या दीर्घकालीन उच्चांकाच्या जवळपास 2000 अंकांची गरज आहे. यापूर्वी हा उच्चांक 27 सप्टेंबर 2024 रोजी झाला होता. सकाळच्या सत्रात 9 वाजून 45 मिनिटांवर निफ्टी 24,332.95 अंकांवर व्यापार करत होता.

 

गुंतवणूकदारांना मोठा फायदा

 

दुसरीकडे शेअर बाजारातील तेजीचा बुधवारी गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. गुंतवणूकदारांचा फायदा आणि तोटा बीएसई मार्केट कॅपशी निगडीत आहे. एक दिवसांपूर्वी बीएसईचे मार्केट कॅप 4,27,37,717.23 कोटी रुपये होते. आता उच्चांकी भरारीमुळे मार्केट कॅप 4,30,99,457.63 कोटी रुपयांवर पोहचले आहे. सात दिवसांच्या व्यापारी दिवसात गुंतवणूकदारांनी 37.17 लाख कोटी रुपयांची कमाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -