आयटी कंपनी डायनाकॉन्स सिस्टीम्स अँड सोल्यूशन्सच्या शेअर 5 वर्षात 56 पटीनं वाढला आहे. तर, 2 वर्षात 200 टक्के वाढला आहे. तर, 2 आठवड्यात 19 टक्के मजबूत झाला आहे.
अलीकडच्या काळात कंपनीला एलआयसीकडून 138.44 कोटी रुपयांचं डिजिटल वर्कप्लेस सोल्यूशन्सचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे.
हे येत्या तीन वर्षात पूर्ण करावं लागणार आहे.
पाच वर्षांपूर्वी या कंपनीचा शेअर 20 रुपयांवर होता. 23 एप्रिल 2020 ला या कंपनीचा शेअर20.5 रुपयांवर होता. तर, 23 मार्च 2025 ला कंपनीचा शेअर 1164.05 रुपये आहेत. पाच वर्षात 5578.29 टक्के रिटर्न दिला आहे.
ज्या गुंतवणूकदारानं 25 हजारांचे शेअर घेतले असतील त्याचे 14 लाख रुपये झाले असतील. तर, ज्यानं 1 लाखांचे शेअर घेतले असतील त्याचे 56 लाख रुपये झाले असतील. जर ते गुंतवणूकदारानं कायम ठेवले असतील तर त्याला फायदा झाला असेल. कंपनीली ऑक्टोबर-डिसेंबर 2024 च्या तिमाहीत निव्वळ नफा 18.31 कोटी रुपये झाला होता.