Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्र‘आशिया कप’ वर भारत-पाकिस्तान तणावाचे सावट, पाकिस्तान खेळाडूंना नाही मिळणार व्हिसा, हॉकी...

‘आशिया कप’ वर भारत-पाकिस्तान तणावाचे सावट, पाकिस्तान खेळाडूंना नाही मिळणार व्हिसा, हॉकी विश्वचषकाचे भवितव्य काय?

जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी क्रूरतेचा कळस गाठला. त्यांनी निरपराध 26 पर्यटकांना टार्गेट केले. या घटनेने पाकिस्तान आणि भारताचे संबंध ताणल्या गेले. भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहे. तर त्यांचा व्हिसा सुद्धा रद्द करण्यात आला आहे. या नवीन घडामोडींमुळे आशिया कपवर सावट उभे ठाकले आहे. हॉकी आशिया कप हा 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर यादरम्यान बिहार येथील राजगीर येथे आयोजित करण्यात आला आहे.

 

हॉकी विश्वचषकाचे वेळापत्रक बदलणार?

 

बिहार येथील राजगीरमध्ये आशिया कप होणार आहे. हा कप म्हणजे जागतिक हॉकी फेडरेशनद्वारे घेण्यात येणाऱ्या 2026 मधील विश्वचषकासाठी पहिली पायरी असते. यामध्ये जे संघ उत्कृष्ट कामगिरी करतात, त्यांची निवड विश्वचषकासाठी करण्यात येते. या महिन्याच्या सुरूवातीला भारतीय हॉकी संघाने या टुर्नामेंटविषयी माहिती दिली होती, त्यानुसार, पाकिस्तान, दक्षिण कोरिया, मलेशिया, चीन आणि जपान हे या स्पर्धेत सहभागी होणार होते.

 

इंडियन एक्सप्रेसला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानसोबतचे सामने दुसर्‍या एखाद्या ठिकाणी खेळवले जाऊ शकतात. तर येत्या काही महिन्यात जर परिस्थिती सामान्य झाली तर कदाचित हे सामने येथेच खेळवले जाऊ शकतात. सध्या वेट अँड वॉच अशी परिस्थिती आहे. सरकारच्या धोरणानुसार पुढील निर्णय घेण्यात येतील असे स्पष्ट होत आहे.

 

हॉकी वर्ल्ड कपसाठी आशिया कप महत्त्वाचा

 

हॉकी वर्ल्ड कपसाठी आशिया कप महत्त्वाचा आहे. हे विश्वचषकात पोहचण्यासाठीचे तिकीट आहे. पुढील वर्षी हॉकी विश्वचषक होत आहे. नेदरलँड आणि बेल्जियम ही दोन राष्ट्र त्याचे आयोजन करत आहे. या स्पर्धेत परंपरागत प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान भिडतील तर भारताची दक्षिण कोरियासोबत सुद्धा टक्कर होईल.

 

2023 मध्ये पाकिस्तानची फुटबॉल टीम भारतात दक्षिण आशिया चॅम्पियनशीप खेळली. तर भारतीय खेळाडू डेव्हिस कपसाठी इस्लामाबाद येथे गेले होते. पण नुकत्याच झालेल्या आयसीसी सामन्यात भारतीय संघाचे सामने पाकिस्तानात खेळवण्यात आले नव्हते, हे विशेष. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -