मुलगी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यात त्यांचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वागद (इजारा) येथे ही घटना घडली.प्रल्हाद खंदारे असे मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे.
खंदारे हे पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी असून त्यांची मुलगी मोहिनी हिला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगला रँक मिळाला. हा आनंदोत्सव साजरा करताना प्रल्हाद खंदारे हे ग्रामस्थांना पेढे वाटत होते.
या वेळी खंदारे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे खंदारे परिवारावर आनंदाच्या क्षणी दुःखाचा डोंगर कोसळला आहे.