Thursday, July 31, 2025
Homeमहाराष्ट्रआज इंडियन एअर फोर्स जे करणार त्यामुळे पाकिस्तान डबल हादरणार

आज इंडियन एअर फोर्स जे करणार त्यामुळे पाकिस्तान डबल हादरणार

पाकिस्तान सोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडियन एअर फोर्स आज शक्ती प्रदर्शन करणार आहे. उत्तर प्रदेशच्या गंगा एक्सप्रेस वे वरुन राफेल-जगुआर, मिराज ही फायटर विमान लँडिंग आणि टेकऑफ करतील. आपातकालीन स्थितीत एक्सप्रेस वे ला रनवे बनवण्याच प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे. भारताची सैन्य तयारी पाहून इस्लामाबादची भितीने गाळण उडाली आहे. त्याशिवाय अरबी समुद्रात भारतीय नौदलाचा घातक युद्ध सराव सुरु आहे. भारतीय नौदल अरबी समुद्रात दारुगोळ्याच्या माध्यमातून आपली ताकद दाखवत आहे. महत्त्वाच म्हणजे हे सर्व पाकिस्तानपासून फक्त 85 नॉटिकल मैल अंतरावर सुरु आहे. अरबी समुद्रात भारतीय नौदल एकापेक्षाएक सरस शस्त्रांद्वारे फायरिंग कौशल्य दाखवत आहे.

 

काही क्षणांमध्ये ही शस्त्र आपलं टार्गेट उद्धवस्त करत आहेत. भारतीय नौदलाने काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात मीडियम रेंज मिसाइल आणि अँटी शिप मिसाइलची यशस्वी चाचणी केली होती. नेवीची घातक शस्त्रांद्वारे विध्वंसक वॉर एक्सरसाइज सुरु आहे. भारतीय नौदल ज्या शस्त्रांद्वारे युद्धसराव करत आहे, ती जास्त घातक आहेत. डिफेन्स सूत्रांनुसार कुठल्याही असामान्य स्थितीसाठी वॉरशिप्सना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलं आहे. त्याशिवाय अँटी शिप आणि अँटी एअरक्राफ्ट शस्त्रांसह युद्ध सराव सुरु आहे.

 

कुठल्या एक्सप्रेस वे वर ही एअरस्ट्रिप?

 

गंगा एक्सप्रेस वे वर बनवलेल्या देशातील पहिल्या एअरस्ट्रिपवर एअरफोर्सचे फायटर जेट दिवस-रात्र लँडिंग करु शकतात. शाहजहांपूर येथे एक्सप्रेस वे वर ही एअरस्ट्रिप बनवण्यात आली आहे. इथे 3.9 किमी लांबीची एअरस्ट्रिप आहे. हा एक्सप्रेस वे मेरठ ते प्रयागराज पर्यंत आहे. एअरफोर्स आज आणि उद्या दिवसा आणि रात्री अशा दोन्हीवेळी एअर शो आयोजित केला आहे.

 

कुठली फायटर जेट्स उतरणार?

 

गंगा एक्सप्रेस वे वर राफेल, मिराज-2000, जगुआर, SU-30 MKI, मिग-29, AN-32, C-130J सुपर हरक्यूलिस आणि MI-17 V5 हेलिकॉप्टर उतरणार आहेत.

 

एक्सप्रेस वे च का?

 

आपातकालीन स्थितीत लँडिंग आणि उड्डाणाच्या सरावासाठी

 

युद्धकाळात पर्यायी रनवे म्हणून वापर

 

सुरक्षा तयारीच्या मजबुतीसाठी एक्सरसाइज

 

12 एक्सप्रेस वे उतरु शकतात फायटर जेट्स

 

गंगा एक्सप्रेस वे यूपीमधला चौथा असा एक्सप्रेस-वे आहे, जिथून फायटर प्लेन लँडिंग आणि उड्डाण करु शकतात. इंडियन एअर फोर्सने फायटर जेट्सच्या लँडिंग आणि टेकऑफसाठी देशातील 12 एक्सप्रेस वे ची निवड केली आहे. यात यमुना एक्सप्रेसवे, पूर्वांचल एक्सप्रेसवे, लखनऊ-आगरा एक्सप्रेसवे, दिल्ली-जयपुर एक्सप्रेसवे, मुंबई-नागपुर एक्सप्रेसवे, बंगळुरु-चेन्नई एक्सप्रेसवे, हैदराबाद-विजयवाड़ा एक्सप्रेसवे, कोलकाता-धनबाद एक्सप्रेसवे, अमृतसर-जालंधर एक्सप्रेसवे, चंडीगढ़-लुधियाना एक्सप्रेसवे, अहमदाबाद-वडोदरा एक्सप्रेसवे आणि नागपुर-हैदराबाद एक्सप्रेसवेचा समावेश होतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -