Friday, May 9, 2025
Homeराजकीय घडामोडीमोठी बातमी! राहुल गांधी नरेंद्र मोदींच्या भेटीला, दिल्लीत मोठ्या घडामोडी

मोठी बातमी! राहुल गांधी नरेंद्र मोदींच्या भेटीला, दिल्लीत मोठ्या घडामोडी

पहलगाम हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिन्ही सेनादलाचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, केंद्रीय मंत्री यांच्यासोबत बैठका घेत आहेत. तर दुसरीकडे देशाच्या सीमेवरही सैन्य सज्ज झाले आहे. असे असतानाच आता खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान कार्यालयात मोदी आणि राहुल गांधी यांच्यात भेट होणार आहे.

 

राहुल गांधींच्या भेटीचे कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात भेट होणार आहे. राहुल गांधी पंतप्रधान कार्यालयात पोहोचले आहेत. या भेटीत केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयच्या संचालकपदाच्या नियुक्तीसंदर्भात चर्चा होणार आहे. तत्पुर्वी नरेंद्र मोदी यांनी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी एक बैठक घेतली आहे. त्यानंतर आता राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात भेट होणार आहे.

 

मोदींचा बैठकांचा धडाका

आज सकाळपासून नरेंद्र मोदी यांचा बैठकांचा धडाका चालू आहे. सकाळी त्यांनी सकाळी संरक्षण सचिवांशी एक बैठक घेतली. संध्याकाळ सरता सरता आता मोदी आणि राहुल गांधी यांच्यात बैठक होत आहे. या भेटीमध्ये अन्य कोण-कोणत्या विषयांवर चर्चा होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

 

सीबीआयच्या संचालकांची नुयक्ती कशी होते?

सीबीआयच्या संचालकांची नियुक्ती ही त्रिस्तरीय सदस्यांमार्फत होते. या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी असतात. सोबतच या समितीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतात. यासह देशाचे सरन्यायाधीशही या समितीत असतात. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन अॅक्ट 2003 नुसार सीबीआयच्या संचालकांची नियुक्ती केली जाते. सीबीआय संचालकांचा कार्यकाळ हा दोन वर्षांचा असतो.

 

पहलगाम हल्ल्याविषयी चर्चा होणार का?

राहुल गांधी आणि मोदी यांच्या भेटीची सध्या देशभरात चर्चा होत आहे. देशात पहलगामचा हल्ला ताजा आहे. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या मोदी आणि राहुल गांधी यांच्या बैठकीत पहलगामविषयी चर्चा होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही बैठक सीबीआय संचालकांच्या निवडीसाठी असली तरी पहलगामवर काही चर्चा होणार का? चर्चा झालीच तर ती काय असेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -