Tuesday, July 22, 2025
Homeदेश विदेशपाकिस्तानात विमानतळं, शाळा बंद, रुग्णालयात रांगा; नेमकी स्थिती काय?

पाकिस्तानात विमानतळं, शाळा बंद, रुग्णालयात रांगा; नेमकी स्थिती काय?

पहलगाम हल्ल्यानंतर अवघ्या 15 दिवसातच भारताने पाकिस्तानचा बदला घेतला आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या अनेक ठिकाणांना उद्धवस्त केले आहे. यामुळे पाकिस्तानात भीतीचे वातावरण पसरले आहे. पहलगाम हल्ल्याच्या अवघ्या १५ दिवसांत भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ केले. याद्वारे भारताने पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या २६ नागरिकांचा बदला घेतला आहे. या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे.

 

भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानातील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोत पाकिस्तानच्या रस्त्यांवर भयाण शांतता आणि तणाव दिसत आहे. पाकिस्तानमधील परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आज सकाळी १० वाजता राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत पाकिस्तान सरकारकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहेत.

 

अनेक विमानतळे बंद, शाळा बंद

दरम्यान, मरयम नवाज यांनी ट्वीटरवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत पंजाबमधील सर्व शाळा बंद राहतील, असे जाहीर केले आहे. तसेच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील शाळांनाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, पाकिस्तानने प्रमुख विमानतळांवर आणीबाणी घोषित केली आहे. पाकिस्तानातील अनेक विमानतळे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे आकाशातील विमानांची वर्दळ थांबली आहे

 

पाकिस्तानात भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण

मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामाबाद, कराची, लाहोर, मुल्तान, फैसलाबाद, स्कार्दू आणि पेशावर यांसारख्या विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक परदेशी विमान कंपन्यांनी पाकिस्तानकडे जाणारी आपली उड्डाणे रद्द केली आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुजफ्फराबादमध्येही भारतीय हल्ल्यानंतर मोठी विनाशकारी दृश्ये पाहायला मिळाली. या ठिकाणी दहशतवाद्यांची एक मशीद उद्ध्वस्त झाली आहे. ही मशीद दहशतवाद्यांकडून बैठका आयोजित करण्यासाठी वापरली जात होती. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर (एलओसी) सतत गोळीबार सुरू आहे. ज्यामुळे पोलिसांनी सीमावर्ती भागातील गस्त वाढवली आहे. एकंदरीत, भारताच्या या कठोर कारवाईमुळे पाकिस्तानात भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

पायाभूत सुविधांना कोणतेही नुकसान

भारतीय सैन्याने ७ मे रोजी रात्री १ वाजता ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. या कारवाईत सुमारे १०० दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे. भारतीय सैन्याने जारी केलेल्या निवेदनात ही कारवाई मर्यादित स्वरूपाची असून, केवळ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांना कोणतेही नुकसान पोहोचवण्यात आलेले नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -