Saturday, August 2, 2025
Homeमहाराष्ट्रमहत्त्वाची बातमी! दहावीचा निकाल या तारखेला लागणार; संभाव्य तारीख आली समोर

महत्त्वाची बातमी! दहावीचा निकाल या तारखेला लागणार; संभाव्य तारीख आली समोर

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीचा रिझल्ट कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. दहावीचा निकाल हा १५ मेपर्यंत लागू शकतो असं सांगण्यात आले आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर दहा दिवसात दहावीचादेखील निकाल जाहीर करु असं सांगण्यात आलं आहे.

 

त्यामुळे लवकरच दहावीचा निकाल लागणार आहे.

पुढच्या आठवड्यात दहावीचा निकाल (SSC Result Date)

 

पुढच्या आठवड्यात १५ तारखेपर्यंत दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. याबाबत बोर्डाने अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, बारावीच्या निकालानंतर १० दिवसात दहावीचा रिझल्ट जाहीर करु असं सांगितलं होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

दहावीचा निकाल कसा चेक कराल? (How To Check 10th SSC Result)

 

दहावीचा निकाल तुम्ही ऑनलाइन पद्धतीने वेबसाइटवर जाऊन चेक करु शकतात.

 

mahahsscboard.in

 

mahresult.nic.in

 

msbshse.co.in

 

mh-ssc.ac.in

 

sscboardpune.in या वेबसाइटवर जाऊन रिझल्ट पाहू शकतो.

 

अकरावी प्रवेशप्रक्रिया

 

अकरावी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया १९ मेपासून; माहिती भरणं ८ मेपासून सुरु होणार आहे. शालेय शिक्षण विभागाने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार असून, विद्यालयांना आवश्यक माहिती पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया ८ मेपासून सुरू होईल. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज आणि प्रोफाइल तयार करण्याची सुविधा १९ मेपासून सुरू होणार आहे.

 

बारावी पूरवणी परीक्षा

 

बारावी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) जून-जुलैमध्ये बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ७ ते १७ मे या कालावधीत नियमित शुल्कासह, तर १८ ते २२ मे या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -