Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रऑपरेशन सिंदूरमध्ये भारत इस्रायलपेक्षा एक पाऊल पुढे, कसं ते समजून घ्या

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारत इस्रायलपेक्षा एक पाऊल पुढे, कसं ते समजून घ्या

भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी मिळून ऑपरेशन सिंदूर यशस्वी करुन दाखवलं आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये भारताच्या 26 निरपराध पर्यटकांची हत्या करण्यात आली. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हे हत्याकांड केलं. पाकिस्तानच्या या नापाक कृतीला भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे उत्तर दिलं. प्रत्युत्तराची कारवाई म्हणजे हा पहलगामचा बदलाच होता. भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी हाय लेव्हल प्लानिंग करुन आपलं शौर्य आणि क्षमता जगाला दाखवून दिली. याआधी उरी दहशतवादी हल्ला, त्यानंतर पुलवामा हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक केला होता. पण यावेळची कारवाई त्यापेक्षा पुढची होती. पंतप्रधान मोदींनी बिहार येथील जाहीर सभेत सांगितलेलं, दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडची शिक्षा दिली जाईल तशीच Action 7 मे च्या रात्री झाली.

 

झाली.

 

 

भारताने ड्रोन आणि मिसाइलव्दारे पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले. यात प्रामुख्याने जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनांनी मुख्यालय होती. पाकव्याप्त काश्मीर POK आणि पाकिस्तानात एकाचवेळी हल्ले करण्यात आले. जैशचा हेड मौलान मसूद अझरच कुटुंब या हल्ल्यात ठार झालं. 100 दहशतवादी मारले गेले. याआधी इतकी मोठी कारवाई कधी झाली नव्हती. कोलॅट्रल डॅमेज म्हणजे या कारवाईत सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्यात आली. फक्त आपलं लक्ष्य आणि दहशतवादी यांनाच संपवण्यात आलं. यातून भारतीय सैन्य दलांनी आपली अचूक हल्ला करण्याची क्षमता प्रदर्शित केली.

 

इस्रायलच्या आकाशात काही महिन्यांपूर्वी जी दुश्य दिसली, तेच भारतातही दिसलं

भारताच्या या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने त्याच दिवशी मध्यरात्री ड्रोन, मिसाईल आणि फायटर जेटद्वारे भारताच्या 15 शहरांवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. लष्करी तळ त्यांचे लक्ष्य होते. पण भारताच्या अभेद्य हवाई सुरक्षा प्रणाली म्हणजे एअर डिफेन्स सिस्टिमने त्यांचे सर्व हल्ले परतवून लावले. सलग दोन दिवस पाकिस्तानकडून असा अयशस्वी हल्ल्याचा प्रयत्न सुरु होता. इस्रायलच्या आकाशात काही महिन्यांपूर्वी जी दुश्य दिसली होती. तेच भारतातही दिसलं. भारताकडे सुद्धा आर्यन डोम सारखी मजबूत एअर डिफेन्स सिस्टिम असल्याचा संदेश जगात गेला.

 

व्हिडिओ, फोटोंसह पुरावे दाखवले

 

इस्रायलकडे त्यांना शत्रूच्या ठावठिकाण्यापासून सर्व माहिती असते. भारताने सुद्धा या कारवाईत हेच दाखवून दिलं. 7 मे च्या एअर स्ट्राइकनंतर कुठे आणि का हल्ले केले? कुठले दहशतवादी कोणात्या तळावरुन भारतात आलेले? ते व्हिडिओ, फोटोंसह पुरावे दाखवले. त्यानंतर पाकिस्तानात अगदी सरगोदापर्यंत एअर स्ट्राइक केला. त्यातही ठराविक लक्ष्य उडवले. खरतर भारताला पाकिस्तानात कुठेही हल्ला करता आला असता, पण भारताने फक्त लष्करी ठिकाणांपर्यंत आपली कारवाई मर्यादीत ठेवली.

 

म्हणून इस्रायलपेक्षा आपण एक पाऊल पुढे

 

इस्रायल जेव्हा पॅलेस्टाइनमध्ये घुसून कारवाई करतो, तेव्हा ते सर्वसामान्यांना ते लक्ष्य बनवतात. पण भारताने आपल्या कारवाईत शत्रूला वचक बसेल आणि योग्य संदेश जाईल अशीच कारवाई केली. इस्रालयच्या कारवाईमध्ये अमेरिकासोडून जगातील कुठलाही दुसरा देश त्यांच्यासोबत नसतो. पण आज भारतासोबत जगातील सगळे देश नसेल, तरी विरोध कुणीही केलेला नाही, म्हणून इस्रायलपेक्षा आपण एक पाऊल पुढे आहोत असं म्हटलय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -