Thursday, July 24, 2025
Homeक्रीडाप्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी सात संघांना किती सामने जिंकावे लागतील?

प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी सात संघांना किती सामने जिंकावे लागतील?

आयपीएल 2025 स्पर्धेतील 17 सामन्यांचा खेळ शिल्लक आहे. त्यापैकी 13 सामने साखळी फेरीत होणार आहे. यात सात संघाचं प्लेऑफचं ठरणार आहे. चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ या स्पर्धेतून बाद झाले आहेत. चला जाणून इतर सात संघांचं प्लेऑफचं गणित

 

गुजरात टायटन्स: शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत. 18 गुण मिळवण्यासाठी आणि पुढील टप्प्यात जाण्यासाठी जीटीला उर्वरित तीन सामन्यांपैकी एक सामना जिंकणे आवश्यक आहे.

 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाने 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अजून तीन सामने खेळायचे आहेत आणि जर त्यांनी यापैकी एक सामना जिंकला तर ते 18 गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरतील.

 

 

पंजाब किंग्स: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने 11 पैकी 7 सामने जिंकले आहेत. जर त्यांनी उर्वरित तीन पैकी दोन सामने जिंकले तर ते 19 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करतील.

 

 

मुंबई इंडियन्स: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 7 सामने जिंकले आहेत. जर त्यांनी उर्वरित दोन पैकी दोन सामने जिंकले तर ते 18 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात.

 

 

दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने 11 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी सहा सामने जिंकले आहेत. त्यामुळे, जर दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या पुढील तीन पैकी तीन सामने जिंकले तर 19 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित होईल.

 

लखनौ सुपरजायंट्स: ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपरजायंट्स संघाने खेळलेल्या 11 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. जर त्यांनी उर्वरित 3 पैकी 3 सामने जिंकले तर त्यांना 16 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकते. पण इतर संघांची कामगिरीही महत्त्वाची ठरणार आहे.

 

कोलकाता नाईट रायडर्स: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआरने आतापर्यंत खेळलेल्या 12 पैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. जर त्यांनी उर्वरित दोन सामने जिंकले तर ते 15 गुणांसह अव्वल चारमध्ये स्थान मिळवू शकतात. परंतु पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाला 15 गुण मिळाले तरच केकेआरला नेट रन रेटच्या आधारे प्लेऑफमध्ये पात्र होण्याची संधी मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -