कोवाडे (ता. आजरा) येथे शेतातील विजेच्या धक्क्याने बाप-लेकाचा मृत्यू झाला. आप्पा रामचंद्र पोवार (वय ६९) व रविंद्र आप्पा पोवार (वय ३६) अशी त्यांची नावे आहेत.
ही घटना आज (दि.१९) सकाळी साडे आठ ते नऊच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बापलेक नेहमीप्रमाणे सकाळी साडे आठ ते नऊ च्या दरम्यान पेद्रेवाडी हद्दीतील शेताकडे फेरफटका मारण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक विजेचा धक्का बसला. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. दुपारपर्यंत घरी न आल्याने शोधाशोध केली असता दोघांचा मृतदेह आढळून आला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आजरा ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले आहेत.






