Friday, July 25, 2025
Homeक्रीडारोहित शर्मा अन् विराट कोहलीनंतर आता आणखी एका भारतीय खेळाडूने केली निवृत्तीची...

रोहित शर्मा अन् विराट कोहलीनंतर आता आणखी एका भारतीय खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा; भावनिक पोस्ट करत म्हणाला…

भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर आता आणखी एका भारतीय खेळाडूने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

 

प्रियांक पांचाळ (Priyank Panchal Retirement) याने काल (26 मे) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत प्रियांकने निवृत्ती घेत असल्याचे सांगितले. गुजरात आणि इंडिया ए संघाचे माजी कर्णधार असलेल्या प्रियांकने 17 वर्षांच्या कारकिर्दीत भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.

 

देशांतर्गत क्रिकेटमध्ये 250 हून अधिक सामने खेळले-

गुजरातकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या प्रियांक पांचाळने वयाच्या 35 व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 8 हजारांहून अधिक धावा केल्या. सलामीवीर प्रियांकने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 250 हून अधिक सामने खेळले आहेत. 2021 मध्ये प्रियांकची भारतीय संघात निवड झाली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रोहित शर्माला दुखापत झाल्यानंतर त्याला संघात स्थान देण्यात आले होते, पण प्रियांकला पदार्पणाची संधी मिळाली नाही.

 

निवृत्तीची घोषणा करताना प्रियांकची भावनिक पोस्ट-

सोशल मीडियावर प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना प्रियांकने म्हणाला की, मोठे झाल्यावर, प्रत्येकजण त्यांच्या वडिलांकडे पाहतो, त्यांना आदर्श मानतो, प्रेरणा घेतो आणि त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो, मीही त्यापेक्षा वेगळा नव्हतो. माझे वडील माझ्यासाठी बराच काळ शक्तीचा स्रोत होते, त्यांनी मला दिलेली ऊर्जा, माझ्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी, तुलनेने लहान शहरातून उठून एक दिवस भारताची कॅप घालण्याची आकांक्षा बाळगण्याचे धाडस करण्यास त्यांनी मला ज्या प्रकारे प्रोत्साहन दिले ते पाहून मी भारावून गेलो आहे. ते खूप पूर्वी आम्हाला सोडून गेले आणि ते एक स्वप्न होते जे मी जवळजवळ दोन दशके, प्रत्येक हंगामात, आजपर्यंत माझ्यासोबत बाळगले होते. मी, प्रियांक पांचाळ, प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तात्काळ निवृत्ती जाहीर करतो. हा एक भावनिक क्षण आहे. हा एक समृद्ध क्षण आहे. आणि हा एक क्षण आहे जो मला अपार कृतज्ञतेने भरून टाकतो, असं प्रियांक सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला.

 

प्रियांक पांचाळची कारकीर्द-

गुजरात आणि पश्चिम विभागाकडून खेळणाऱ्या प्रियांकने 127 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 45.18 च्या सरासरीने 8856 धावा केल्या. यामध्ये 29 शतके आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. प्रियांकच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 16 विकेट्स आहेत. प्रियांकने 97 लिस्ट ए सामन्यांमध्ये 3672 धावा आणि 59 टी-20 सामन्यांमध्ये 1522 धावा केल्या आहेत. लिस्ट ए मध्ये त्याच्या नावावर 8 शतके आणि 21 अर्धशतके आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -