Monday, December 15, 2025
Homeइचलकरंजी२०-२२ जणांचा चौघांवर प्राणघातक हल्ला; भयंकर

२०-२२ जणांचा चौघांवर प्राणघातक हल्ला; भयंकर

इचलकरंजी शहरातील जवाहरनगर परिसरात सोमवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास चौघांवर प्राणघातक हल्ला झाला. हे चौघे जण रात्री रस्त्याच्या कडेला गप्पा मारत बसले होते.

 

त्याचवेळी वीस ते बावीस जण दुचाकींवरून त्या ठिकाणी आले. त्यांनी अचानक हल्ला चढवला.

 

जवाहरनगर परिसरात चार तरूण गप्पा मारत होते. त्याचवेळी अचानक दुचाकींवरून वीस ते बावीस जण दुचाकींवरून आले. त्यांनी या चौघांवर हल्ला केला. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही सर्व घटना बाजूलाच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून २२ जणांना ताब्यात घेतले आहे. लाठ्याकाठ्या, लोखंडी सळ्या, कोयता आणि दगडाने या चौघांना मारहाण करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -