Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्रपंढरपूरसाठी तुमच्या गावातही ST बस येणार; फक्त करा ‘हे’ काम

पंढरपूरसाठी तुमच्या गावातही ST बस येणार; फक्त करा ‘हे’ काम

परिवहन विभागाने वारकऱ्यांसाठी गटबुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जर एकाच गावातील 40 वारकऱ्यांनी एकाच वेळी बुकिंग केली असेल, तर त्या वारकऱ्यांसाठी एसटी बस थेट त्यांच्या गावात जाईल. आणि तेथून त्यांना थेट पंढरपुरात सोडेल. पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनानंतर पुन्हा एकदा सदर वारकऱ्यांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची सुविधा (ST Bus For Ashadhi Wari) उपलब्ध होणार आहे. वारकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आलं आहे.

 

दरम्यान, पुणे जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या वाकऱ्यांची संख्या मोठी असते. यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने आषाढी वारीकरिता पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी ७५० बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यापैकी साडेतीनशे बस या पुणे विभागाच्या असणार आहेत. तर, इतर चारशे बस मुंबई व विदर्भ विभागातून मागविण्यात आल्या आहेत. भाविकांची वाढती संख्या बघून या बसेस सोडण्यात येतील. पुणे विभागातील १४ आगारांतून पंढरपूरसाठी एसटी सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. गेल्या तीन-चार वर्षांतील गाड्यांच्या तुलनेत यंदा एसटीकडून जादा गाड्या सोडण्यात (ST Bus For Ashadhi Wari) आल्या आहेत, त्यामुळे यंदा पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना एसटी बसेसच्या कमतरतेचा सामना करावा लागणार नाही, असा दावा एसटी प्रशासनाने केला आहे.

 

यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये आषाढी एकादशी 6 जुलै रोजी (रविवार) साजरी होईल. त्यानिमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरला प्रस्थान करतील. संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी) आणि संत तुकाराम महाराज (देहू) यांच्या पालख्या या वारीत प्रमुख असतात. याशिवाय संत निवृत्तीनाथ (त्र्यंबकेश्वर), संत एकनाथ (पैठण), संत गजानन महाराज (शेगाव) आदींच्या पालख्याही पंढरपूरकडे प्रस्थान करतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -