Monday, August 25, 2025
Homeमहाराष्ट्रइथे मुलींना मिठी मारून मुले कमावतात पैसे, 5 मिनिटांसाठी मोजतात 600 रुपये

इथे मुलींना मिठी मारून मुले कमावतात पैसे, 5 मिनिटांसाठी मोजतात 600 रुपये

चीनमध्ये सध्या एक विचित्र ट्रेंड सुरू आहे. हा ट्रेंड अवघ्या काही दिवसात व्हायरल झाला आहे. मुली तणावमुक्तीसाठी त्याचा वापर करत आहेत. तणाव घालवण्यासाठी, नकारात्मकता आणि अश्रूंना वाट मोकळी करून देण्यासाठी मुलीच नाही तर महिलांनी सुद्धा या ट्रेंडचे कौतुक केले आहे. मॅन मम्सच्या (Man Mums) मदतीने मुली तिच्या मनातील दबलेले दुख, तिचा तणाव हलका करत आहेत. यामध्ये एका तरुणाला मिठी मारण्यात येते. त्याबदल्यात या मुली त्याला पैसे देतात. सध्या अनेक मुलं ही सेवा देऊन पैसे कमावत आहेत. काय आहे हा प्रकार?

 

South China Moring Post च्या एका वृत्तानुसार, मॅन मम्स हा शब्द तसा तर जीममध्ये जाऊन कसदार शरीर कमावणाऱ्या तरुणासाठी वापरात येतो. पण आता तरुणी, कामावर जाणाऱ्या महिला, घरगुती ताणतणावाचा सामना करणाऱ्या स्त्रीया मॅन मम्सकडे त्यांचे दुख, तणाव व्यक्त करुन मोकळ्या होतात. त्या अशा सेवा देणार्‍या तरुणाला मिठी मारतात आणि हुंदके देत रडतात. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवतात. त्याला मिठी मारण्यासाठी मॅन मम्स 20 ते 50 युआन (म्हणजे 250 रुपये ते 600 रुपयांपर्यंत) पैसे घेतो. अर्थात या मुलींना 5 मिनिटांपर्यंत ही मिठी मारता येते. तिच्या भावना व्यक्त करता येतात.

 

एका विद्यार्थिनीने या ट्रेंडची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. तिच्या माहितीनुसार, अभ्यासाचा ताण आल्याने तिने एकदा अशा मॅन मम्सची मदत घेतली होती. त्यावेळी तिचे मन हलके झाले होते. या जादूकी झप्पीमुळे तिचा ताण तणाव कुठल्या कुठे पळाला. तिला चांगले वाटले. ती त्या मॅन मम्सला अजून पैसे देऊन त्याच्यासोबत वेळ घालवू इच्छित होती. ही पोस्ट चीनमध्ये एकदम व्हायरल झाली. आता सध्या या सेवेची मागणी जोरात असल्याचा दावा या वृत्तपत्रात करण्यात आला आहे.

 

या वृत्तानुसार, मॅन मम्स हा मेट्रो स्टेशन, शॉपिंग मॉल अथवा सार्वजनिक ठिकाणी हमखास दिसतो. अनेकदा महिला, मुली त्याच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडतात. त्यांच्या भावना व्यक्त करतात. त्यामुळे त्यांच्या मनावरील अज्ञात, ज्ञात भावनिक ओझे हलके होते. अर्थात जितका जास्त देखणा तरुण, तेवढी तो रक्कम अधिक आकारतो. त्याचे बोलणे, त्याचे व्यक्तिमत्व, त्याचे कसदार, पिळदार शरीर यावरून सुद्धा ही रक्कम काही प्रमाणात वाढते. पण ही रक्कम देण्यासाठी महिला, तरुणी मागेपुढे पाहत नाहीत. एका ठराविक वेळेत मॅन मम्स भेटतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -