Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगरत्नागिरीतील वृद्धाचा कोरोनाने कोल्हापुरात मृत्यू, आतापर्यंतचे तीनही बळी इतर जिल्ह्यांतील

रत्नागिरीतील वृद्धाचा कोरोनाने कोल्हापुरात मृत्यू, आतापर्यंतचे तीनही बळी इतर जिल्ह्यांतील

जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या तीनवर गेली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील बेलारी येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

 

आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात २८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. हे तीनही बळी इतर जिल्ह्यांतील आहेत.

 

प्लास्टिक कारखान्यातून निवृत्त झालेले हे ज्येष्ठ नागरिक ७ जून रोजी सीपीआरमध्ये दाखल झाले होते. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले होते. अशातच त्यांचा मृत्यू झाला. १४ मे २०२५ पासून कोल्हापूर जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर २८ जणांना लागण झाली असून, यातील १६ जण कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील आहेत. आठ जण ग्रामीण भागातील आहेत तर चार रुग्ण इतर जिल्ह्यांतील असून, यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. १७ जणांची तब्येत बरी झाली असून, त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.

 

कोरोनाची भीती बाळगण्याची गरज नाही. जुन्या व्याधी आणि प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांना याचा जास्त त्रास होता. ७० टक्क्यांहून अधिक रुग्णांची तब्येत ठीक झाली असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घ्यावेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -