इचलकरंजीतील ट्रक मालक संघाने जोथपुर, पाली, बालोत्रा (राज्यस्थान) येथे कापड गाठी वाहतूक करणाऱ्यां विविध मागण्यांसाठी सोमवार पासून बंद पुकारले होते. त्यामुळे तीन दिवसांपासून सर्व वाहतूक ठप्प झाली होती.
गेल्या दोन ते तीन दिवसापासून मग मोटार मालक संघ व ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्यात बैठका सुरू होत्या. बुधवारी रात्री उशिरा पुन्हा बैठक घेण्यात आली. या
बैठकीत भाडेवाढ देण्याचे मान्य केले असून गुरुवारपासून वाहतूक सुरळीत होणार आहे.
बालोत्रा ९९ हजार व पाली ८८ हजार ५०० रुपये ट्रक वाहतुकीस भाडे देण्याचे ट्रान्सपोर्ट असोसिएशनने मान्य केले आहे. या बैठकीत ट्रान्स्पोर्ट असोसिएशन अध्यक्ष अशोक शिंदे, प्रदिप बहिरगुंडे, हरिष गुप्ता, मुकेश डदिच, विठ्ठल कागनगी, ट्रक मोटार मालक संघाचे संजय अवलकी, आनंदराव नेमिष्ठे, वसिम गैबान, विनायक विरडे, सुशांत खरात, राजू जगताप, सचिन जाधव हे उपस्थित होते.