Wednesday, June 25, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : ट्रकखाली सापडून वृध्देचा मृत्यू

इचलकरंजी : ट्रकखाली सापडून वृध्देचा मृत्यू

येथील इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात ट्रक वळण घेत असताना झालेल्या अपघातात ट्रकच्या चाकाखाली सापडून भोनेमाळ येथील पादचारी वृध्देचा मृत्यू झाला. गौराबाई लगोंडा पाटील + (वय ७०) असे त्यांचे नाव आहे. अपघातानंतर ट्रकचालक स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला.

 

भोनेमाळ परिसरात राहणाऱ्या गौराबाई पाटील या शनिवारी सायंकाळी औद्योगिक वसाहतीमधून चालत घराकडे निघाल्या होत्या. त्या अश्विनकुमार टेक्स्टाईलजवळ आल्या असता

त्याचवेळी शाहु पुतळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रक वळण घेत होता. अचानकपणे ट्रकच्या पाठीमागील चाकात त्या सापडल्या आणि चाक त्यांच्या अंगावरून गेले. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी आरडाओरडा केल्यामुळे ट्रकचालकाने ट्रक थांबविला.

 

पण ट्रकचे चाक पाटील यांच्या अंगावरुन गेले असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याकडे मिळून आलेल्या पाकीटात सापडलेल्या फोन नंबरवर संपर्क साधला असता त्यांचे नातेवाईक दाखल झाले आणि त्यांची ओळख पटली. अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. वाहतूक पोलीसही दाखल झाले. घटनेनंतर ट्रक चालक स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -