आषाढी कार्तिकी भक्तगण येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती” या फक्त गाण्याच्या ओळी नाही तर प्रत्येक वारकऱ्याच्या मनातील भावना आहेत.. महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग युगे अठ्ठावीस वीटेवरी उभा असा हा पंढरीचा राजा एकमेव देव आहे ज्य़ाला माऊली म्हटलं जातं. या माऊलीच्या भेटीसाठी असंख्य वैष्णवांचा मेळा पंढरपूरी पायी चालत जातो..असा हा भक्तीचा मेळा दरवर्षी आपल्या पांडुरंगाला भेटण्यासाठी जमा होतो… या वर्षी हि मोठ्या प्रमाणात वारकरी येत्या ६ जूनला आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात दाखल होणार आहेत. त्यासाठी शासनाची हि जोरदार तयारी चालू आहे. मराठवाडा,विदर्भातील वारकऱ्यांना प्रवास हा सुलभ व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणात बस सोडण्यात आल्या आहे. एकट्या मराठवाड्यातून दहा दिवसात तब्बल १३५ जादा बस सोडण्यात येत आहेत,अशी माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मोठी वारी भरते. त्यासाठी मराठवाड्यातूनही मोठ्या प्रमाणात वारकरी येतात. याच निमित्ताने महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने यंदा मराठवाड्यातील वारकऱ्यांची सोय करण्याकरिता छत्रपती संभाजीनगर परिवहन विभागामार्फत नियोजन केले आहे. मराठवाडयातून तब्बल १० दिवस दररोज १३५ बसेस येथून धावणार आहेत, अशी माहिती वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली आहे. पंढरपूरला विठ्ठल-रुख्माईची ही वारी २ ते १३ जुलैपर्यंत भरणार असून, यात्रा कालावधीत या बस सोडण्यात येतील. तसेच विदर्भातील भाविकही येथूनच एसटीने पंढरपूरला (ST Buses For Pandharpur) जातात. यंदा भाविकांची मोठी गर्दी पाहता प्रत्येक वारकऱ्याचा प्रवास सुलभ व्हावा,या दृष्टीने जालना, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आगारातून मोठ्या प्रमाणात बस सोडल्या जाणार आहेत.
कोणत्या आगारातून किती बसेस ? ST Buses For Pandharpur
आषाढी एकादशी वारी दरम्यान ऐनवेळी जास्त गर्दीमुळे मागणी वाढली तर तात्काळ जादा बस सोडल्या जाणार आहेत. त्यानुसार, छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बसस्थानक आगारातून पंढरपूरला रवाना होणाऱ्या प्रवाशांसाठी २५. तर सिडको बसस्थानक येथून ३०, पैठणहून २०, सिल्लोड येथून २०, वैजापूरहून १०, कन्नडहून १०, गंगापूर येथून १० तर सोयगाव बसस्थानकावरून १० अशा एकूण १३५ बस रवाना होणार असल्याची माहिती वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली आहे.