ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो.
दैनिक राशिफल (Horoscope Today 29 June 2025 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष राशी (Aries Daily Horoscope)
मेष राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस सुख-समृद्धी वाढवणारा ठरेल. आज तुमच्या आनंदाच्या गोष्टींमध्ये काही मर्यादा येतील. व्यवहार संबंधित बाबतीत सावधगिरी बाळगा. सासरच्या मंडळींपैकी कोणासोबतही व्यवहार करताना काळजी घ्या. अनावश्यक आणि फुकटच्या खर्चावर आज नियंत्रण ठेवा. संतती आज तुमच्या अपेक्षांवर उतरेल. आज तुम्ही एखादे घर किंवा वाहन इत्यादी खरेदी करू शकता. कामाच्या ठिकाणी शत्रू मित्राचा आव आणतील आणि तुम्हाला त्यांना ओळखावे लागेल.
वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)
आजचा दिवस धन-धान्यात वाढ घेऊन येईल. आज तुम्ही लोकांसोबत शांततेत वेळ घालवाल. काही शारीरिक समस्येमुळे आज तुम्हाला थोडी चिंता राहील. कुटुंबातील कोणाला काही वचन दिले असेल तर ते वेळेवर पूर्ण करा. आई-वडिलांचा पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. कुटुंबात कोणत्या तरी पार्टीचे आयोजन होईल. आज देवाच्या भक्तीत तुमचे मन रमेल.
मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)
तुमच्यासाठी आजचा दिवस समस्यांचा राहील. आज तुम्हाला एकामागून एक कौटुंबिक समस्या सतावतील, त्यामुळे तुमच्या चिंतेत वाढ होईल. व्यवसायात आज तुमची फसवणूक होऊ शकते. कुठल्या प्रवासावर जाण्याची तयारी करत असाल तर आज काही काळासाठी तो पुढे ढकला, कारण अपघात होण्याची शक्यता आहे. आज कुणाच्या प्रकरणात बोलण्याचे टाळा. मुलांच्या अभ्यासाबद्दल आज तुम्हाला चिंता वाटू शकते.
कर्क राशी (Cancer Daily Horoscope)
आजचा दिवस मालमत्तेच्या बाबतीत चांगला जाईल. आज तुम्ही व्यवसायात काही बदल करण्याचा विचार कराल. भागीदारीत काम करण्यासाठी अनुकूल वेळ आहे, पण तुम्हाला तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवावे लागतील. आज तुम्हाला तुमच्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष द्यावे लागेल, नाहीतर तुमच्या समस्या वाढू शकतात. आज नोकरीच्या कामामुळे तुम्ही त्रस्त असाल तर तेही दूर होईल. आज तुम्ही तुमच्या कामाशीच मतलब ठेवा. प्रेयसीसोबत कडाक्याचं भांडण होईल. बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा.
सिंह राशी (Leo Daily Horoscope)
आजचा दिवस मिश्र फलदायी राहील. कामाच्या ठिकाणी आज मनासारखे काम मिळाल्याने तुमचा आनंद गगनात मावणार नाही. पण तुमच्या आजूबाजूच्या लोकांना यामुळे समस्या निर्माण होऊ शकते. प्रॉपर्टीची (मालमत्तेची) कोणतीही डील फायनल करण्यासाठी जात असाल तर आज त्यात थोडे लक्ष द्यावे लागेल. संततीकडून आज काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज वाहन चालवताना अत्यंत काळजी घ्या, काही दुखापत होण्याची शक्यता आहे.
कन्या राशी (Virgo Daily Horoscope)
आजचा दिवस उर्वरित दिवसांच्या तुलनेत चांगला राहील. आज तुम्ही समजूतदारपणे माघार घेऊ नका. आज येथे तिथे रिकामे बसून वेळ घालवण्याचे टाळा. प्रेमीयुगुल आज लाँग ड्राइव्हवर जातील. नोकरीतील समस्येबाबत आज जीवनसाथीकडून सल्ला आणि सूचना घ्या. कौटुंबिक नात्यांमध्ये मजबुती टिकवून ठेवावी लागेल. आज उधारी वसूल होईल. अचानक धनलाभ होईल.
तुळ राशी (Libra Daily Horoscope)
आजचा दिवस खर्चिक राहील. व्यवसायाच्या योजनांना पूर्णपणे लाभ मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडल्याने आज थोडी धावपळ करावी लागू शकते. आज विनाकारण खर्च करण्यापासून बचाव करावा लागेल. जर एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत व्यवहार केला तर तुमचे पैसे अडकण्याची पूर्ण शक्यता आहे. घरातील कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. फिरायला जाताना आज काही महत्त्वाची माहिती मिळेल. विरोधकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापासून दूर राहा.
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)
आजचा दिवस दीर्घकाळापासून रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल असेल. आज तुम्ही लहान मोठ्या योजनांचा लाभ घ्याल. एखाद्या स्पर्धेत भाग घेतला असेल तर आज त्याचा निकाल लागेल. घरखर्चावर पूर्ण लक्ष द्यावे लागेल. संततीच्या संगतीकडे पूर्ण लक्ष द्या. आज काहीतरी नवीन करण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी होईल. आज कौटुंबिक प्रकरणाचा योग्य तोडगा काढा. शासकीय नोकरीची तयारी करणाऱ्यांना आज चांगली बातमी मिळेल.
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)
आजचा दिवस सामान्य राहील. धार्मिक कार्यात आज तुमचे मन लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही समस्या त्रास देत असेल तर ती दूर होईल. जीवनसाथीसोबत कोणत्याही बाबतीत वादात पडू नका. आज विपरीत परिस्थितीतही संयम राखा. कामाबाबत काही बदल करण्याचा विचार करत असाल तर त्यातही यश मिळेल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल.
मकर राशी (Capricorn Daily Horoscope)
आजचा दिवस सुख-सुविधांमध्ये वाढ घेऊन येईल. आज कोणत्यातरी शुभ किंवा मांगलिक कार्यक्रमाचे आयोजन होईल. आज तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे जाल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने आज तुमचे अडकलेले काम पूर्ण होईल. प्रेमीयुगुल आज जीवनसाथीसोबत भविष्यातील योजनांवर चर्चा करतील, त्यामुळे त्यांचे संबंध अधिक दृढ होईल. आज तुम्हाला दूर राहणाऱ्या एखाद्या नातलगाची आठवण येऊ शकते.
कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)
आजचा दिवस लाभदायक राहील. पैशांबाबत काही समस्या त्रास देत असतील तर आज त्या दूर होतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना एखाद्या डीलमुळे आज चिंता वाटत असेल तर ती डीलही फायनल होऊ शकते. सासरकडूनही धनलाभ होताना दिसत आहे. समाजसेवेशी संबंधित लोकांचे समर्थन आणि प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या आजूबाजूचे वातावरण आज आनंदी राहील. कोणत्यातरी कामासाठी प्रवासावर जाऊ शकता.
मीन राशी (Pisces Daily Horoscope)
आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल. आज व्यवसायात चढ-उतारांचा सामना करावा लागेल. आज तुम्ही तुमची ऊर्जा योग्य कार्यात वापरलीत तर तुमच्यासाठी चांगले राहील. आज तुम्ही कुणाकडून पैसे उधार घेतले असतील तर ते परत मागितले जाऊ शकतात. कुटुंबात एखाद्या मुद्द्यावर मतभेद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नात्यांमध्ये कटुता येईल. तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवलेत तर तुमच्यासाठी चांगले राहील. जीवनसाथीच्या भावना आदराने स्वीकारा.