Wednesday, July 2, 2025
Homeक्रीडाRCB च्या खेळाडूवर लैंगिक शोषणाचे आरोप; भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ

RCB च्या खेळाडूवर लैंगिक शोषणाचे आरोप; भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ

आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाचा जलदगती गोलंदाज यश दयाल वर लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. यश दयाल याने लग्नाचे आमिष दाखवून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. महिलेने मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाइन तक्रार पोर्टलवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे यश दयालच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे तसेच या एकूण संपूर्ण प्रकरणामुळे भारतीय क्रिकेट विश्वातही खळबळ उडाली आहे.

 

महिलेचा आरोप नेमका काय ? Yash Dayal

महिलेने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की ती यश दयालसोबत पाच वर्षांपासून तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता. तेव्हापासून तो तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत आहे. लग्नाचे आश्वासन देऊन यश दयालनेआपले भावनिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केले. या काळात यश दयालने तिच्याकडून पैसेही घेतले. आपल्याकडे यश दयाल सोबत बोललेलं दोघांच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट, व्हिडिओ कॉल आणि फोटोंचे पुरावे आहेत असा दावाही सदर महिलेने केला आहे.

 

यश दयालने (Yash Dayal) या काळात महिलेची ओळख त्याच्या कुटुंबाशी सुद्धा करून दिली होती. त्यामुळे तिने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला नवऱ्यासारखं वागवलं. मात्र जेव्हा तिला समजलं कि आपली फसवणूक झाली आहे तेव्हा तिने विरोध केला. परंतु तेव्हा तिला मारहाण करण्यात आली आणि मानसिक छळ करण्यात आला असं सदर महिलेने तक्रारीत म्हंटल आहे. तसेच माझ्याव्यतिरिक्त इतर महिलांसोबतही यश दयालने असे कृत्य केलं आहे, असा दावाही या महिलने केला आहे

 

दरम्यान, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने इंदिरापुरमच्या सर्कल ऑफिसरकडून या प्रकरणी अहवाल मागितला आहे. पोलिसांना हे प्रकरण सोडवण्यासाठी २१ जुलैपर्यंत वेळ देण्यात आला आहे. महिलेने १४ जून २०२५ रोजी महिला हेल्पलाइनवर तक्रारही दाखल केली आहे. या प्रकरणाची कायदेशीर पद्धतीने लवकरात लवकर आणि निष्पक्षपणे चौकशी करावी. हे पाऊल केवळ तिच्यासाठीच नाही तर अशा संबंधांना बळी पडणाऱ्या सर्व मुलींसाठी महत्त्वाचे आहे, अशी मागणीही सदर महिलेने केली आहे.

 

कोण आहे यश दयाल-

यश दयाल (Yash Dayal) हा एक भारतीय क्रिकेटर आहे, जो आपल्या डाव्या हाताच्या मध्यम-गतीच्या गोलंदाजी साठी प्रसिद्ध आहे. त्याचा जन्म 13 डिसेंबर 1997 रोजी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज (पूर्वीचे अलाहाबाद) येथे झाला. 27 वर्षीय यश दयालने सप्टेंबर 2018 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये यूपीसाठी लिस्ट-अ मध्ये पदार्पण केलं. त्याच वर्षी या युवा खेळाडूनं रणजी करंडकातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर यश दयाल फेब्रुवारी 2019 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीद्वारे यूपीसाठी टी-20 पदार्पण करण्यात यशस्वी झाला. मात्र तो पहिल्यांदा प्रकाशझोतात आला ते आयपीएल मध्ये… 2022 मध्ये गुजरात टायटन्सने त्याला 3.2 कोटींना विकत घेतले. परंतु 2023 मध्ये त्याच्या एका ओव्हरमध्ये रिंकू सिंगने 5 षटकार मारले. पुढे 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने त्याला 5 कोटींना विकत घेतले. यशने 13 सामन्यांत 15 विकेट घेत RCB ला प्लेऑफपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -