शहरातील मोठमोठ्या शाळांतील शिक्षक असोत किंवा एखाद्या शाळा म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं, शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत घर करून राहतात.
हल्ली सोशल मीडियावर गावाकडच्या शाळांमधील अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यातील काही व्हिडीओंमध्ये शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांसह सुंदर नृत्य करताना दिसतात, तर कधी कविता म्हणताना दिसतात. दरम्यान, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील एक छोटा विद्यार्थी एक, दोन… अंक म्हणताना दिसतोय.
शाळेत असताना आपल्यापैकी अनेकांनी अंकांचे पाठांतर, बाराखडी संपूर्ण वर्गासमोर म्हणून दाखवली असेल. कधी कधी यातील बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांकडून चुकतात. या व्हिडीओतील चिमुकलाही एक, दोन… म्हणताना चुकतो पण तरीही तो थांबत नाही. त्याचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका विद्यार्थ्याला त्याचे शिक्षक सर्वांसमोर उभं करून एक, दोन… म्हणायला सांगतात. यावेळी तो न घाबरता सर्व वर्गासमोर अंक म्हणायला सुरूवात करतो यावेळी मधले काही अंक तो गाळतो जे ऐकून बाजूला बसलेले काही विद्यार्थी हसतात. पण, तरीही तो घाबरत नाही किंवा थांबत नाही. उलट मोठ्या आत्मविश्वासाने तो अंक म्हणतो. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dinesh.mahale.7 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत चार मिलियन व्ह्युज आणि एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “नाद नाही करायचा मराठी शाळेतील मुलांचा ” आणखी एकाने लिहिलेय, “चुकीचं का असेना पण तरी तो बोलतोय” आणखी एकाने लिहिलेय, “काही प्रॉब्लेम नाही बाळा तुझ्यासारखेच लोक पुढे जाऊन आमदार होतात.