Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रकोरोना लसीमुळे तरुणांचे अचानक मृत्यू? ICMR, एम्सचं संशोधन; केंद्र सरकारने स्पष्टच सांगितलं

कोरोना लसीमुळे तरुणांचे अचानक मृत्यू? ICMR, एम्सचं संशोधन; केंद्र सरकारने स्पष्टच सांगितलं

कोरोनाच्या महासाथीनंतर देशात कोरोना प्रतिबंधक लस बंधनकारक करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर देशात गेल्या तीन ते चार वर्षात हृदयविकाराने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

 

यात तरुणांची संख्या लक्षणीय असल्यानं कोरोना लसीबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र आता यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं की, कोरोना लस आणि हृदयविकाराने होणारे मृत्यू याचा काही संबंध नाही. आयसीएमआर आणि एम्सने केलेल्या संशोधनाचा अहवाल मिळाल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.

 

कोरोना महासाथीनंतर अनेक जणांचा चालता-फिरता, अचानक मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. दरदिवशी अनेकांचे असे अचानक मृत्यू होत असल्याचे नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यानंतर कोरोना लसीमुळे असे मृत्यू होतायत अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली होती. पण या मृत्यूंचा आणि कोरोना लसींचा संबंध नाहीय असं केंद्र सरकारने सांगितलंय.

 

आयसीएमआर आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने केलेल्या अभ्यासात समोर आलं की भारतात कोरोना लस सुरक्षित आणि प्रभावी ठरलीय. गंभीर दुष्परिणामाची प्रकरणं दुर्मीळ आहेत. अचानक कार्डियाक अरेस्टच्या मृत्यूची वेगळी कारणं असू शकतात. यात जनुकिय दोष, जीवनशैली, आधीपासून असलेल्या व्याधी आणि कोरोना नंतर उद्भवलेला त्रास हे कारण असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

 

कार्डियाक अरेस्टच्या मृत्यूची कारणं वेगवेगळी असू शकतात. कोरोना लस आणि अचानक मृत्यू यांचा संबंध जोडणं हे चुकीचं आणि संभ्रम निर्माण करणारं आहे. वैज्ञानिकांनी याचं समर्थन केलेलं नाही असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. आयसीएमआरने १८ ते ४५ वयोगटातील लोकांच्या अचानक मृत्यूचे कारण शोधण्यासाठी अभ्यास केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -