Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रजुने कपडे द्या अन नवीन घेऊन जा; अंबानींची सर्वसामान्यांना खास भेट

जुने कपडे द्या अन नवीन घेऊन जा; अंबानींची सर्वसामान्यांना खास भेट

जुने कपडे द्या आणि नवीन कपडे घेऊन जा असं जर तुम्हाला कोणी म्हंटल तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण मित्रानो हे खरं आहे. रिलायन्स रिटेल फॅशन फॅक्टरीने तुम्हाला परवडणारी ऑफर आणली आहे. या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही तुमचे जुने ड्रेस देऊन नवीन कपडे घेऊन घरी जाऊ शकता. महत्वाची बाब म्हणजे साधीसुधी कपडे नव्हे तर अगदी ब्रँडेड ड्रेस तुम्हाला खरेदी करता येणार आहेत. फॅशन फॅक्टरीची हि ऑफर २० जुलैपर्यंत आहे.

 

कसा मिळवाल लाभ? Fashion Factory Exchange Festival

जुने कपडे देऊन नवीन ड्रेस खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमचे जुने ड्रेस शर्ट, टी-शर्ट मुलांचे कपडे फॅशन फॅक्टरी स्टोअरमध्ये आणावे लागतील. या जुन्या कपड्यांच्या बदल्यात कंपनी तुम्हाला एक्सचेंज कूपन देईल. यामध्ये डेनिमसाठी ४०० रुपयांपर्यंत कूपन, शर्टसाठी २५० रुपयांपर्यंत कूपन, टी-शर्टसाठी १५० रुपयांपर्यंत कूपन आणि मुलांच्या कपड्यांसाठी १०० पर्यंत कूपन देण्यात येईल. तुम्ही अशी अनेक कुपन्स गोळा करू शकता. कारण नंतर याच कुपन्सच्या बदल्यात तुम्हाला नवीन कपडे मिळणार आहेत. Fashion Factory Exchange Festival

 

कोणत्या ब्रँडवर फायदा मिळेल?

या एक्सचेंज फेस्टिव्हलमध्ये (Fashion Factory Exchange Festival) तुम्ही ली, ली कूपर, जॉन प्लेयर्स, रेमंड, पार्क अव्हेन्यू, कॅनो, पीटर इंग्लंड, अॅलन सॉली, व्हॅन ह्यूसेन, लुई फिलिप यासारख्या देशातील लोकप्रिय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडचे कपडे खरेदी करू शकता. या कुपन्स व्यतिरिक्त कंपनी ग्राहकांना नवीन खरेदीवर ५०% पर्यंत सूट सुद्धा देत आहे, ज्यामुळे ग्राहकांना प्रचंड फायदा होत आहे. आगामी दिवस सणासुदीचे दिवस आहेत. श्रावण, गणपती, दुर्गमहोत्सव, दसरा आणि दिवाळी असे सण तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन कपडे खरेदीसाठी सर्वसामान्य ग्राहकांना हि मोठी संधी म्हणावी लागेल. तसेच तुमचे जुने कपडेही यामुळे घरातून बाहेर पडतील आणि त्याचा आर्थिक फायदाही होईल. परंतु हि ऑफर फक्त रिलायन्सच्या फॅशन फॅक्टरी स्टोअरमध्येच उपलब्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -