तुम्ही जर स्वस्तात मस्त आणि जास्तीत जास्त फीचर्स असणारा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मित्रानो, हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कमी पैशात मोबाईल लाँच करणारी प्रसिद्ध कंपनी Infinix भारतीय मार्केट मध्ये आणखी एक बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. Infinix Hot 60 5G+ असं या स्मार्टफोनचे नाव असून या मोबाईलची किंमत फक्त 10,499 रुपये आहे. किंमत कमी असली तरी यामध्ये देण्यात आलेले फीचर्स मात्र दमदार आहेत. भारतीय बाजारात हा मोबाईल LAVA, POCO ITEL यांसारख्या ब्रँडना थेट टक्कर देऊ शकतो. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.
डिस्प्ले –
Infinix Hot 60 5G+ ची लांबी 166 मिमी, रुंदी 76.8 जाडी 7.8 मिमी आणि वजन 193 ग्रॅम आहे. स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.7-इंचाचा HD+ पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 720 x 1600 पिक्सेल रिझोल्यूशन, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 560 nits पर्यंत ब्राइटनेस आहे. IMG BXM-8-256 GPU सह ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7020 6nm प्रोसेसर बसवण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. तुम्ही मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने हे स्टोरेज वाढवू शकता. इनफिनिक्सचा हा मोबाईल IP64 रेटिंगसह येतो ज्यामुळे धूळ आणि पाण्यापासून त्याला कोणताही धोका नाही.
कॅमेरा – Infinix Hot 60 5G+
मोबाईलच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, Infinix Hot 60 5G+ मध्ये पाठीमागील बाजूला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर समोर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईलला 5200mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 18W चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये यामध्ये 5G, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ 5.4, GPS, 3.5mm ऑडिओ जॅक, FM रेडिओ आणि USB टाइप C 2.0 पोर्ट यांसारखे फीचर्स मिळतात.
किंमत किती?
nfinix Hot 60 5G+ च्या 6GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,499 रुपये आहे. हा मोबाईल काळा, हिरवा आणि निळ्या रंगात उपलब्ध आहे. येत्या 17 जुलैपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट, इन्फिनिक्स इंडिया ऑनलाइन स्टोअर आणि ऑफलाइन स्टोअरवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. सर्व बँकांच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 500 रुपयांची सूट मिळू शकते.