Wednesday, July 16, 2025
Homeमहाराष्ट्रBSNL चा 87 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; भल्याभल्यांची झोप उडवतोय

BSNL चा 87 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; भल्याभल्यांची झोप उडवतोय

मागील काही महिन्यात airtel, jio, vodafone- idea सारख्या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपले रुचार्ज दर वाढवले आहेत. रिचार्जच्या किमती महाग झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलाच चाप बसतोय. अशावेळी पैसे वाचवण्यासाठी अनेकानी आपली सिम कार्ड देशी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL मध्ये कन्व्हर्ट केलं आहे. तर अनेकांनी BSNL चे नवीन सिमकार्ड विकत घेतले आहे. बीएसएनएल सुद्धा जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी पैशात आणि स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन लाँच करत असते. आज आम्ही तुमहाला बीएसएनएल च्या अशाच एका रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत, ज्याने एअरटेल, जिओ सारख्या कंपन्यांची अक्षरशः झोप उडवली आहे.

 

BSNL चा 87 रुपयांचा रिचार्ज प्लॅन- BSNL Recharge Plan

आम्ही तुम्हाला ज्या रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plan) बद्दल सांगतोय तो आहे BSNL चा ८७ रुपयांचा रिचार्ज प्लॅन…. या रिचार्ज प्लॅन मध्ये दररोज 1GB हाई स्पीड इंटरनेट, अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंग सर्व नेटवर्कवर, दररोज 100 SMS ची सुविधा मिळते. बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन १४ दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येतो. महत्वाची बाब म्हणजे या रिचार्ज प्लॅन अंतर्गत ग्राहकांना Zing अँपचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते. ज्या ग्राहकांना कामापुरते इंटरनेट लागत अशा लोकांसाठी बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन बेस्ट पर्याय आहे. इतर कंपन्यांशी तुलना केल्यास बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन खूपच परवडतोय.

 

एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडियाशी तुलना करायची झाल्यास, Jio च्या १४ दिवसांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत 119 रुपये आहे. यामध्ये दररोज 1.5GB इंटरनेट, अनलिमिटेड कॉल आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. Airtel च्या १४ दिवसांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत १२९ रुपये आहे. यामध्ये दररोज 1 इंटरनेट, अनलिमिटेड कॉल आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. तर वोडाफोन आयडियाच्या १८ दिवसांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत ९९ रुपये आहे. मात्र यामध्ये दररोज फक्त २०० mb इंटरनेट, अनलिमिटेड कॉल आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. म्हणजेच काय तर बीएसएनएलचा हा ८७ रुपयांचा रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plan) इतर कंपन्यांपेक्षा नक्कीच वरचढ आहे. ग्राहकांना कमी पैशात भरपूर फायदे या रिचार्जमुळे मिळतायत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -