Saturday, July 26, 2025
Homeमहाराष्ट्रजिवलग मित्रानेच केला दगडाने ठेचून खून

जिवलग मित्रानेच केला दगडाने ठेचून खून

कणंगला (ता. हुक्केरी) येथे जिवलग मित्राचाच दगडाने ठेचून मित्राने खून केला. आनंदा ऊर्फ देमानी सुरेश डुकरे (वय 20, रा. सेनापती कापशी, ता. कागल) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी मुरगूड पोलिसांनी अल्पवयीन मुलाला सेनापती कापशी येथे ताब्यात घेऊन संकेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केले.

 

सुरेश डुकरे हे मूळचे कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील होमनाळी गावचे रहिवासी. गवंडी कामाच्या निमित्ताने वीस वर्षांपूर्वी ते सेनापती कापशी येथे स्थायिक झाले. त्यांचा मुलगा आनंदा शाळा सोडून वडिलांसोबत गवंडी काम करत होता. आनंदाची संशयित अल्पवयीनशी मैत्री झाली.

 

वर्षभरापासून संशयित अल्पवयीन हा आनंदाच्याच घरी जेवण व राहण्यासाठी होता. गेले सहा-सात महिने तो कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यानंतर पुन्हा अलीकडे काही दिवसापासून हे दोघे कापशी परिसरात एकत्रच फिरत होते. दोघांची खास मैत्री असल्याने विविध ठिकाणी कामे घेऊन दोघे एकत्रच काम करत होते.

 

रविवारी आनंदाचे आई – वडील पाहुण्यांच्या गावी गेले होते. ती संधी साधून आनंदा व संशयित अल्पवयीनाने घरातील तिजोरी फोडून किरकोळ दागिने व काही रोख रक्कम चोरून दोघेही कापशीहून निपाणीमार्गे कणंगला येथे गेले. त्यानंतर मद्य प्राशन करून दोघेही सरकारी दवाखान्याच्या पाठीमागील शेतवडीत बोलत बसले होते. सेनापती कापशी गावाकडे परत येण्यावरून त्यांच्यात वाद झाला.

 

यानंतर जोरदार झटापट झाली. त्यातच अल्पवयीन मित्राने रागाच्या भरात आनंदा याला दगडाने ठेचून मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आनंदाचा मृत्यू झाल्यानंतर संशयित रात्रभर कणंगला येथे थांबला होता. सकाळी तो सेनापती कापशी येथे आल्यानंतर मुरगूड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याबाबत संकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -