Monday, July 21, 2025
Homeमहाराष्ट्रमान्सूनबाबत हवामान विभागाकडून मोठी बातमी; नव्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

मान्सूनबाबत हवामान विभागाकडून मोठी बातमी; नव्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

यंदा देशासह राज्यात मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला, महाराष्ट्रात मान्सून सामान्यपणे सात जूनच्या आसपास दाखल होतो, मात्र यंदा 25 मे रोजीच मान्सूननं महाराष्ट्रात एन्ट्री केली. राज्यात मान्सूनची एन्ट्री होताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली, राज्यातील अनेक भागांमध्ये त्यावेळी जोरदार पाऊस झाला, मात्र तीस मे नंतर पावसात काहीसा खंड पडला. त्यानंतर पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली, पुन्हा एकदा 20 जूनच्या आसपास पावसानं ओढ दिली होती, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालं होतं.

 

दरम्यान त्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्यानं पेरण्यांच्या कामाला वेग आला. मात्र अजूनही अनेक भागांमध्ये पावसाचं प्रमाण असमान आहे. मराठवाड्यात अजूनही म्हणावा असा पाऊस पडला नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे. आता शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर घालणारी एक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाच्या नव्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

 

मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे, सध्या तरी मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल वातावरण नाही, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, दोन-तीन दिवसांत पुणे शहर आणि शहरालगत मोठा पाऊस होणार नाही, मात्र 20 तारखेच्या पुढे पावसाचा जोर वाढेल. असा अंदाज हवामान तज्ज्ञ एसडी सानप यांनी वर्तवला आहे.

 

दरम्यान मराठवाड्यात यंदा पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे, शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत, मात्र अजूनही म्हणावा असा पाऊस पडलेला नाही. चांगला पाऊस पडला नसल्यानं शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. परंतु सध्या तरी मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल वातावरण नसल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आल्यानं, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये पावसात खंड पडल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये आता पिके सुकत असल्याचं चित्र आहे. जर वेळेवर पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचं सकंट निर्माण होऊ शकतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -