Wednesday, July 23, 2025
Homeमहाराष्ट्रसलमान खानचा मोठा निर्णय, अचानक मुंबईतील घर विकलं, इतक्या कोटींमध्ये झाला सौदा

सलमान खानचा मोठा निर्णय, अचानक मुंबईतील घर विकलं, इतक्या कोटींमध्ये झाला सौदा

सलमान खान सध्या त्याच्या पुढच्या चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’ मध्ये व्यस्त आहे. सिकंदर नंतर, सलमान त्याच्या पुढच्या चित्रपटात कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. एकीकडे, सलमान ‘बॅटल ऑफ गलवान’ च्या तयारीसाठी चर्चेत असताना, दुसरीकडे, आता सलमानने मुंबईतील त्याचे अपार्टमेंट कोट्यवधी रुपयांना विकल्याचं समोर आलं आहे.

 

सलमान खानने अचानक हा निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे.

 

सलमानने हे अपार्टमेंट किती कोटी रुपयांना विकला

 

सलमानने विकलेले अपार्टमेंट बांद्र पश्चिम येथे होते. हे अपार्टमेंट बांद्रा परिसरातील पाली व्हिलेजमधील शिवस्थान हाइट्समध्ये होतं. हे एक प्रीमियम रेजिडेंशियल कॉम्प्लेक्स आहे. सलमानने हे अपार्टमेंट 5.35 कोटी रुपयांना विकला आहे. घर नोंदणीचे कागदपत्र तपासणी केल्यानंतर स्क्वायर यार्ड्सने याचा खुलासा केला आहे. हा करार या महिन्यात म्हणजेच जुलै 2025 मध्येच झाला आहे.

 

अपार्टमेंट किती मोठे होते?

 

सलमान खानचा हा फ्लॅट फार मोठा नव्हता. फ्लॅट 122.45 चौरस मीटर म्हणजेच 1218 चौरस फूट आहे. या फ्लॅटमध्ये तीन कार पार्किंगची सुविधा देखील आहे. या डीलसाठी 32.01 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली आहे. याशिवाय 30 हजार रुपयांची नोंदणी फी देखील भरण्यात आली आहे. सलमानने विकलेला फ्लॅट त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटपासून सुमारे 2.2 किलोमीटर अंतरावर आहे. सलमान अजूनही त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये त्याच्या कुटुंबासह राहत आहे.

 

मुंबईतील मालमत्तेच्या बाबतीत बांद्रा हे एक प्रमुख ठिकाण मानलं जातं. शाहरुख खान, आमिर खान, करीना कपूर खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि जावेद अख्तर यांच्यासह अनेक स्टार्सची घरे या भागात आहेत. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण देखील लवकरच या भागात स्थलांतरित होणार आहेत.

 

सिकंदरनंतर ‘गॅलवान’ मध्ये दिसणार सलमान

 

टायगर 3 नंतर, सलमान खान या वर्षी सिकंदर चित्रपटात दिसला. सिकंदर फार चालला नाही. आता सलमान त्याच्या पुढच्या चित्रपटावर लक्ष केंद्रित करत आहे. या चित्रपटाचे नाव आहे बॅटल ऑफ गलवान, ज्यामध्ये सलमान एका सैनिकाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -