Thursday, July 24, 2025
Homeमहाराष्ट्रपाणी पातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पाणी पातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणातून 11400, तर चांदोली धरणातून 8530 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

वारणा धरणात बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 28.53 टीएमसी पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टीएमसी आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता (कंसात टीएमसी) पुढीलप्रमाणे : कोयना 77.40 (105.25), धोम 10.53 (13.50), कन्हेर 7.96 (10.10), धोम बलकवडी 2.62 (4.08), उरमोडी 7.53 (9.97), तारळी 4.99 (5.85), वारणा 28.53 (34.40), राधानगरी 7.42 (8.36), दूधगंगा 18.54 (25.40), तुळशी 2.79 (3.47), कासारी 2.08 (2.77), पाटगाव 3.46 (3.72), अलमट्टी 98.44 (123).

 

सांडवा, कालवा व विद्युतगृहाद्वारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे : कोयना धरणातून 11400, कण्हेर 1185, उरमोडी 500, तारळी 1401, वारणा 8530, राधानगरी 3100, दूधगंगा 1600, तुळशी 300, कासारी 900, पाटगाव 300, हिप्परगी बॅरेज 61 हजार 188 व अलमट्टी धरणातून 42 हजार 500 क्युसेक विसर्ग सुरू आहे. बुधवारीची पातळी व कंसात इशारा पातळी (फूट) : आयर्विन पूल सांगली 16 (40) व अंकली पूल हरिपूर 18.10 (45.11).

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -